Marathwada Election Result 2019 LIVE : अशोक चव्हाणांनी गड राखला, भाजपचा मास्टरप्लॅन ठरला फेल

Marathwada Election Result 2019 LIVE :

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 12:25 PM IST

Marathwada Election Result 2019 LIVE : अशोक चव्हाणांनी गड राखला, भाजपचा मास्टरप्लॅन ठरला फेल

भोकर, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांचा निकाल आज लागणार आहे. यात मराठवाड्यातली आठ जिल्ह्यांमध्ये अनेक प्रतिष्ठेच्या लढाई होत आहेत. यातील भोकर विधानसभा मतदार संघातून अशोक चव्हाण रिंगणात होते. सर्वच एक्झिट पोलनं अशोक चव्हाणांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र चव्हाणांनी आपल्या हक्क्याच्या जागेवर विजय खेचून आणला. मतमोजणी सुरू झाल्यापासून अशोक चव्हाण आघाडीवर होते. अखेर त्यांनी भाजपच्या बापूसाहेब गोरठेकर यांचा दारूण पराभव केला.

नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत चव्हाण कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे. देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांचा नांदेड हा बालेकिल्ला मानला जातो. 2014मध्ये देशात मोदी लाट असताना लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. असाच प्रकार यंदाच्या निवडणूकीत दिसून आला. यंदाच्या निवडणूकीत भाजपने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांना फोडून भाजपकडून त्यांना भोकरमध्ये उमेदवारी दिली. त्यामुळं चव्हाण विरोधात गोरठेकर असा जरी समना असला तरी, या मतदारसंघात खऱ्या अर्थानं पुन्हा चव्हाण विरोधात चिखलीकर अशीच लढत होती.

वाचा-Maharashtra Election Result 2019 LIVE:मुख्यमंत्री 50-50 हवा; भाजपच्या कामगिरीनंतर शिवसेनेची मोठी प्रतिक्रिया

वाचा-धनंजय मुंडेना 18 हजारांची आघाडी, पंकजा मुंडेची धाकधुक वाढली

Loading...

अशोक चव्हाणांसाठी जमेच्या बाजू

भोकरमध्ये एकूण 2 लाख 78 हजार 771 मतदार होते. यात सर्वाधिक मराठा समाज 40 % आहे. वंचितसह भोकरमध्ये एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. भोकर मतदारसंघात भोकरसह मुदखेड आणि अर्धापुर तालुक्याचा समावेश आहे. तिन्ही तालुके बागायती आहेत. यात ऊस आणि केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात उत्पादन होते. दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने या मतदारसंघात इसापूर धरनाचे पाणी मिळाले, शिवाय या मतदारसंघात चव्हाण यांचा साखर कारखाना देखील आहे. या दोन जमेच्या बाजू अशोक चव्हाण यांच्यांसाठी आहेत.

लोकसभा पराभवाची मिळाली सहानुभूती

मराठवाड्याच भाजपाची शक्ती वाढत गेली आणि पाच वर्षानंतर 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाण यांचा भाजपने पराभव केला. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीरकरण पूर्णपणे बदलली. लोकसभेत अशोक चव्हाण पडल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूती देखील होती. त्यामुळं या सहानुभूतीमुळं अशोक चव्हाण यांना विजय मिळायला असे म्हणायला हरकत नाही. अशोक चव्हाणांच्या पराभवासाठी भाजपनं पूर्ण ताकद लावली होती. मात्र त्याचा भोकर मतदारसंघात विशेष फरक पडला नाही. त्यामुळं अशोक चव्हणांचा सोपा विजय झाला. बापूसाहेब गोरठेकर यांच्याकडून भाजपला जास्त अपेक्षा होती मात्र एकाही फेरीत त्यांना चव्हाणांना मागे टाकते आले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...