Home /News /maharashtra /

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं घेतला गळफास

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं घेतला गळफास

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

बीड, 30 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आता पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र सुरू झालं आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे. 18 वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हेही वाचा...'जय श्रीराम' असा जयघोष करत लालकृष्ण आडवाणी यांनी केलं निकालाचं स्वागत मिळालेली माहिती अशी की, विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल असावं, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितल. आरक्षण असतं  तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण स्थगिती दिल्यानं मराठा समाज बांधव नाराज झाला आहे. याच नैराश्येतून एका उच्चशिक्षित तरुणानं लातूरमध्ये गेल्या आठवड्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयापुढे ही घटना घडली होता. किशोर गिरीधर कदम (वय-30) असं तरुणाचं नाव आहे. सध्या किशोरवर लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. मराठा समाजाला EWS चे आरक्षण नको... दुसरीकडे, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र असं केल्यास कोर्टात असणाऱ्या आरक्षणाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका घेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक निकषावर आरक्षण नको, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरच आरक्षण हवे, अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीसह मराठा क्रांती मोर्च्याचे काही नेते आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी EWS मध्ये मराठ्यांना आरक्षण न देण्याच्या सूचना देण्यात येतील, असा शब्द दिला. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागास म्हणून सिद्ध झालेला असल्याने इतर कोणतेही आरक्षण मराठा समाजाच्या हिताचे होणार नाही. EWSचे आरक्षण राज्याने मराठा समाजाला लागू केल्यास, सर्वोच्च न्यायालयामध्ये जी लढाई सुरू आहे त्यावर परिणाम होईल. परिणामी मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षणापासून मुकावे लागेल अशी भीती मराठा समाजाला वाटत आहे. हेही वाचा... 2014 पासून ज्या पदांची भरती झाली होती. ती समांतर आरक्षणामुळे रखडले आहेत. त्या पदांच्या सहित सर्वच पदांच्या पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्रे देण्यात यावे. मागच्या चालू वर्षांत शैक्षणिक प्रवेशांची कोणत्याही स्वरूपात हेळसांड होऊ नये. याची खबरदारी शासनाने घ्यावी. अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Maratha kranti morcha, Maratha reservation, Sakal maratha morcha, मराठा आरक्षण maratha aarakshan

पुढील बातम्या