मुंबई 19 सप्टेंबर : माओवादी या प्रतिबंधित संघटनेने देशातील शहरी भागांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदियासह बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमधील अनेक शहरी भाग या संघटनेच्या निशाण्यावर आहेत. या संघटनेने देशभरातील शहरांमध्ये नक्षलवादी कारवाया आणि प्रभाव वाढवण्यासाठी मोठी योजना आखली आहे. या संघटनेने आपल्या समर्थकांना देशाच्या शहरी भागात गनिमी युद्ध वाढवण्याचे आदेश दिले आहेत सावधान! तुम्हालाही कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्याची सवय? पुण्यातून समोर आली धक्कादायक घटना सरकारविरोधात बंडखोर कारवाया वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमध्ये सक्रियता वाढवून संघटना मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशभरात तुरुंगात असलेल्या संघटनेच्या सदस्यांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गनिमी कावा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संघटनेने आपल्या आदेशात दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही छुप्या पद्धतीने घुसखोरी केल्याची कबुली दिली आहे.. त्यामुळे केंद्र सरकारला कृषीविषयक कायदे मागे घ्यावे लागले. 19 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशात संघटनेचा वर्धापन दिन 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यास सांगण्यात आले आहे. पुण्याजवळ शिवशाही बसचा मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर मिळालेल्या माहितीनुसार, ही संघटना गेल्या वर्षी गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या आपल्या टॉप बॉस मिलिंद तेलतुंबडेसह 26 जणांच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजना आखत आहे. गेल्या वर्षी 30 महिलांसह सुमारे 124 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यामुळे या संघटनेलाही मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंदी घातलेल्या संघटनेच्या या प्लॅनची माहिती समोर आल्यानंतर गडचिरोली पोलीस सतर्क झाले असून, वर्धापन दिनाचा सोहळा यशस्वी होऊ नये यासाठी 21 सप्टेंबरपासून कारवाई सुरू करण्याची तयारी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.