मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, अनेक मातब्बर नेते मैदानात

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, अनेक मातब्बर नेते मैदानात

Pandharpur By-election : तालुक्यातील अनेक नेते मंडळींचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत असून तालुक्यात याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Pandharpur By-election : तालुक्यातील अनेक नेते मंडळींचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत असून तालुक्यात याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Pandharpur By-election : तालुक्यातील अनेक नेते मंडळींचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत असून तालुक्यात याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पंढरपूर, 12 मार्च : दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Bhalke) यांचं निधन झाल्यामुळे पुढील काही दिवसात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Pandharpur By-election) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक नेते मंडळींचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत असून तालुक्यात याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

संभाव्य उमेदवारांमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, दामाजी सहकारी साखर करखान्याचे चेअरमन व आवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे ,शिवसेना महिला नेत्या शैला ताई गोडसे, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे नाव मागील काळात व आताही चर्चेचे केंद्र बनलेलं आहे.

या सर्व नेतेमंडळींनी मोर्चे बांधणी अतिशय मजबूत करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये भगीरथ भालके यांनी नुकतीच काढलेली 'जनसंवाद यात्रा' तर दुसऱ्या बाजूला समाधान आवतडे यांनी काढलेली 'सुसंवाद यात्रा', अभिजीत पाटील यांच्याकडून सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धा, तसंच विविध सामाजिक उपक्रम या सर्व माध्यमातून या नेतेमंडळींची जनतेच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद 3 महिन्यांनंतर उफाळला, हाणामारीत तब्बल 18 जण जखमीएकीकडे उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असतानाच राज्यसरकारने पंढरीचा शेतकऱ्यांचा राजवाडा असणाऱ्या श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची टाच ठेवल्याने भालके गटाला एक प्रकारे शह देण्याचे काम केल्याचं दिसत आहे. त्यातच मागील काही दिवसात सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत युटोपीयन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाकडून एक वेगळा चेहरा देण्याचं शरद पवार यांच्या मनात आहे का? अशा प्रकारची चर्चा सुरू आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ नेहमीच शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आता पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार हे पंढरपूर या मतदारसंघात कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Assembly session, Pandharpur (City/Town/Village), Pandharpur news