जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद 3 महिन्यांनंतर उफाळला, हाणामारीत तब्बल 18 जण जखमी

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद 3 महिन्यांनंतर उफाळला, हाणामारीत तब्बल 18 जण जखमी

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद 3 महिन्यांनंतर उफाळला, हाणामारीत तब्बल 18 जण जखमी

Gram Panchayat Election Dispute : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून आता एका समाजातील दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वाशिम, 12 मार्च : वाशिम (Washim) जिल्ह्यातील शिरपूर जैन नजीकच्या ढोरखेडा येथे जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) कारणावरून आता एका समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेत 18 जण जखमी झाले. यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांच्यावर वाशिमच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिपरपूर जैनजवळ असलेल्या ढोरखेडा इथं जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत राजू दौलत सावळे यांनी विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी पराभव केला होता. त्यामुळे एकाच समाजातील दोन गटात नेहमी वाद निर्माण होऊ लागले. या वादाचे रूपांतर 11 मार्चच्या रात्री हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही गटातील अठरा जण जखमी झाले असून त्यातील जे गंभीर जखमी आहेत त्या 8 आणि इतर 4 अशा बारा जणांना पुढील उपचाराकरीता वाशिम येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. या हाणामारीत राजू दौलत सावळे या ग्रामपंचायत सदस्यासह अनिल विठ्ठल सावळे, समाधान दौलत सावळे, दीपक बबन सावळे,ओंकार नथू हिवराळे,संपत पिराजी सावळे, बबन पिराजी सावळे,विठ्ठल संपत सावळे, सुनील नामदेव जाधव, उज्वला ओमकार हिवराळे, विजय नामदेव जाधव, शरद वामन सावळे,शशिकला विठ्ठल सावळे, सुनिता समाधान सावळे, जयश्री राजू सावळे, विद्या मनीष सावळे, दौलत गणपत सावळे व कौशल्याबाई दौलत सावळे हे 18 जण जखमी झाले. त्यापैकी 12 जणांना वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. हेही वाचा - अकोला हादरलं! मुलीच्या नावावर जमीन केल्यानंतरही आईची दगडावर आपटून केली हत्या याप्रकरणी 12 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दौलत सावळे यांनी फिर्याद दिल्याने शिरपूर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. ग्रामपंचायत असो की इतर स्थानिक पातळीवरची निवडणूक या निवडणुकीत आपापसात छोटे मोठे वाद नित्याचीच बाब आहे. केवळ निवडणूक असल्यानं भावा-भावामध्ये मोठं वितुष्ट निर्माण होऊन अनेक गंभीर घटना घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणूक आणि राजकारण याबाबत लोकांमध्ये आणखी प्रगल्भता येण्याची गरज असल्याचं या घटनांमुळे अधोरेखित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात