Home /News /lifestyle /

प्रेमासाठी सोडली राजगादी; सामान्य व्यक्तीसोबत लग्न करायचं म्हणून राजकुमारीचा त्याग

प्रेमासाठी सोडली राजगादी; सामान्य व्यक्तीसोबत लग्न करायचं म्हणून राजकुमारीचा त्याग

आपल्या प्रियकरासाठी राजकुमारीनं 7 वेळा विवाहाचा प्रस्ताव नाकारला आहे. तिला राजघराण्याकडून सुमारे 9.10 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार होती.

टोकियो, 04 सप्टेंबर : जपानची (Japan Princess) राजकुमारी माको (Princess Mako) ही राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य नागरिकासोबत लवकरच विवाह (Marriage) करणार आहे. आपल्या प्रियकरासाठी माकोनं 7 वेळा विवाहाचा प्रस्ताव नाकारला आहे. तिला राजघराण्याकडून सुमारे 9.10 कोटी (13.70 येन) रुपये नुकसान भरपाई मिळणार होती. परंतु, माकोने ही भरपाई घेण्यास नकार दिला आहे. राजघराण्यातील महिला सामान्य व्यक्तीशी विवाह करणार असल्याने, याची जोरदार चर्चा होत आहे. 29 वर्षांची राजकुमारी माको जपानचे सध्याचे राजा नारूहितो यांचे बंधु राजकुमार आकिशिनो ( Prince Akishino) यांची मुलगी आहे. तिने तिचा प्रियकर कोमुरोशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर अमेरिकेत (America) स्थायिक होण्याची तयारी सध्या ती करत आहे. राजघराण्यानेदेखील या लग्नाला मान्यता दिली आहे. राजकुमारी माकोचा प्रियकर कोमुरो हा सध्या अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेत आहे. कोमुरोला स्किईंग, व्हायोलीन वाजवणं तसेच कुकिंगचा छंद आहे. समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनाला चालना मिळावी यासाठी तो `प्रिन्स ऑफ द सी` म्हणून काम करत आहे. याबाबत राजकुमारी माकोनं सांगितलं, की `परस्परांविषयी आदर राखून एकत्रितपणे वैवाहिक आयुष्य जगणं मला महत्त्वाचं वाटतं. आम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. कोणत्याही कठीण प्रसंगात आम्ही एकमेकांना साथ देऊ.’

Jogging For Health : दिवसभरात 7000 पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होतो कमी? संशोधनातून मोठा खुलासा

 के.ई.कोमुरोने डिसेंबर 2013मध्ये एका स्नेहभोजनावेळी राजकुमारी माको हिला लग्नाची मागणी घातली. या दोघांनी आपले प्रेमसंबंध दीर्घकाळ लपवून ठेवले होते. त्यानंतर राजकुमारी माको शिक्षणासाठी ब्रिटनला (Britain) निघून गेली.
राजकुमारी माकोनं 2017 मध्ये, मी नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याचवेळी तिनं 2020 पर्यंत आपला विवाह स्थगित केला होता. राजकुमारी माको कोमुरोवर जीवापाड प्रेम करत असून, त्यासाठी तिने यापूर्वी विवाहाचे 7 प्रस्ताव फेटाळून लावले होते. राजकुमारी हे पद परत करणारी राजकुमारी माकोची आत्या राजकुमारी सयाको ही राजघराण्यातील शेवटची महिला होती. 2005 मध्ये सयाकोचा राजधानी टोकियोतील (Tokyo) एका अधिकाऱ्यासोबत विवाह झाला होता. हे दोघे एकत्र शिक्षण घेत होते. याचदरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली आणि ते विवाहबंधनात अडकले. सुंदर दिसण्यासाठी Sanitizer ठरू शकतं उपयोगी? जपानच्या राजघराण्यात केवळ पुरुष गादीचे वारसदार असतात. त्यामुळे सध्या राजकुमारी माकोचा 14 वर्षांचा लहान भाऊ राजकुमार हिसाहितो हा त्याचे वडील आकिशिनो यांच्या व्यतिरिक्त गादीचा एकमेव वारसदार आहे. जपानमधील राजघराण्याची परंपरा आणि नियमानुसार, राजघराण्यातील महिलेने बाहेरील व्यक्तीशी विवाह केला तर तिच्या अपत्यांना गादीचा वारसदार मानलं जात नाही.
First published:

Tags: Japan, Love story

पुढील बातम्या