Home /News /national /

Sheena Bora हत्याकांड प्रकरण: Indrani Mukherjea ला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Sheena Bora हत्याकांड प्रकरण: Indrani Mukherjea ला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

शीना बोरा हत्याकांड प्रकरण: इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर (File Photo)

शीना बोरा हत्याकांड प्रकरण: इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर (File Photo)

Sheena Bora murder case: शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukherjea) सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 18 मे : शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora murder case) प्रकरणात अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे. इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukherjea) सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी मुखर्जी गेल्या साडे सहा वर्षांपासून कारागृहात आहे. (Indrani Mukherjea grant bail from Supreme Court in Sheena Bora murder case) शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणी तेव्हापासून मुंबईतील भायखळा कारागृहात आहे. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अनेकदा इंद्राणी मुखर्जीचा जामीन नाकारला होता. इंद्राणी मुखर्जीकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यांनी म्हटलं, इंद्राणी मुखर्जी कलम 437 अंतर्गत विशेष सूट मिळवण्यास ती पात्र आहे आणि ती बऱ्याच काळापासून तुरुंगात आहे. युक्तीवाद करताना मुकुल रोहतगी यांनी म्हटलं, 237 पैकी 68 साक्षीदार तपासण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून इंद्राणी मुखर्जीला पॅरोल देण्यात आलेला नाही. यावर पॅरोल का दिला नाही अशी विचारणा केली असता रोहतगी यांनी म्हटलं, आपण पॅरोल घेतला नाही. मात्र, त्यांचे पती पीटर मुखर्जी यांना जामीन मिळाला आहे. वाचा : अभिनेत्री केतकी चितळेला मोठा झटका, न्यायालयाने दिला 'हा' निर्णय काय आहे शीना बोरा हत्याकांड प्रकरण? 2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळला. 2015 मध्ये तीन वर्षांनी या हत्येचा मुलगडा झाला. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला अटक केल्यावर सर्व प्रकरण समोर आलं. इंद्राणी मुखर्जीने शीनाला मुंबईतील वांद्रे परिसरात बोलावून तिचा गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील जंगलात नेऊन टाकला. पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिच्याशी आई इंद्राणी मुखर्जीचा वाद व्हायचा आणि त्यातूनच या हत्येचं षडयंत्र रचल्याचं समोर आलं. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा ड्रायवर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी आणि पहिला पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आली. इंद्राणीने शीना ही आपली मुलगी नाही तर बहीण असल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या पतीचा मुलगा राहुल याच्यासोबत शीनाचे प्रेमसंबंध होते. पीटर मुखर्जी यांना 2020 मध्ये जामीन मंजूर झाला. कोर्टाच्या सुनावणी दरम्यान इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दोघांचा घटस्फोट झाला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Sheena murder case, Supreme court

    पुढील बातम्या