मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जीवाशी खेळ: वापरलेल्या मास्कपासून गादी बनवण्याचा गोरखधंदा, एकाला अटक

जीवाशी खेळ: वापरलेल्या मास्कपासून गादी बनवण्याचा गोरखधंदा, एकाला अटक

गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनवण्यात येत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी छापा टाकून याठिकाणी कारवाई केली असता परिसरात मास्क पडलेले आढळून आले.

गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनवण्यात येत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी छापा टाकून याठिकाणी कारवाई केली असता परिसरात मास्क पडलेले आढळून आले.

गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनवण्यात येत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी छापा टाकून याठिकाणी कारवाई केली असता परिसरात मास्क पडलेले आढळून आले.

जळगाव, 12 एप्रिल: कोरोनाच्या पार्श्नभूमीवर संसर्ग पसरण्यापासून वाचवण्यासाठी अनेक खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. कारण  एकमेकांच्या संपर्कात न येताही कोरोनाची केवळ निष्काळजीपणामुळे लागण होऊ शकते. पण जळगावात चक्क वापरलेल्या मास्कची गादी बनवून लोकांचे जीवच धोक्यात घालण्याचा प्रकार घडला. पोलिसांना गादी बनवण्यासाठी मास्क वापरले जात असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी मालकाला अटक केली आहे.

कोरोनापासून बचावाचं सर्वात महत्त्वाचं अस्त्र मास्क हे आहे. पण मास्कच्या वापरानंतर जर ते पुन्हा वापरता येणारे नसेल तर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागणं गरजेचं आहे. तसं झालं नाही तर त्यापासून इतरांना संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळं वैद्यकीय कचऱ्याची ज्या पद्धतीनं विल्हेवाट लावली जाते, तशी त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. पण तसं प्रत्यक्षात होत नसल्याचं पाहायला मिळालं आहे. उलट जळगावात नागरिकांनी वापरलेल्या मास्कपासून गादी बनवण्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं.

जळगावच्या कुसुंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे महाराष्ट्र गादी भांडार आहे. याठिकाणी अशा प्रकारे वापरलेले मास्क वापरून गादी बनवली जात असल्याची माहिती मिळाली. कुसुंबा येथील पोलीस पाटील राधेशाम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी सिद्धेश्‍वर डापकर, शांताराम पाटील यांनी गादी भांडार गाठले. याठिकाणी पाहणी केली असता, मिळालेल्या माहितीनुसार गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनवण्यात येत असल्याचं समोर आलं. याठिकाणी अनेक मास्क पडल्याचंही दिसून आलं.

(वाचा - गुजरातमध्ये कोरोनामुळे स्मशानभूमीत रांग;अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितल्याचा आरोप)

पोलिसांनी याबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी याला विचारपूस केली. पण त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी मालक अमजद मन्सुरी याला अटक केली असून त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सिद्धेश्‍वर डापकर यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

(वाचा - धुळे: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह)

कोरोनाचा संसर्ग एकाकडून दुसऱ्याला पोहोचू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. अगदी मृतदेह देखील नातेवाईकांना दिले जात नाही. असं असतानाही काही लोक केवळ काही पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Crime news, Jalgaon, Mask, Police arrest, Raid, Shocking news