मालेगाव, 19 एप्रिल: मालेगाव शहरात एकीकडे कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत असताना दुसरीकडे सामान्य रुग्णालयात गोंधळ घालण्याचे व तोडफोडीचे सत्र थांबता नाही आहे. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर गोंधळ घालत रुग्णालयात तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी घाबरले. ते पळापळ करु लागले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णलायत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. हेही वाचा… देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 700 वर, तर मृत्यूने ओलांडला 500चा आकडा याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे इस्लामपुरा भागातील एका 45 वर्षीय रुग्णाला अतिशय गंभीर अवस्थेत त्याचे नातेवाईक दवाखान्यात घेऊन आले होते. दरम्यान, या रुग्णावर ताबडतोब अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना विषाणूचे लक्षणं दिसून आल्यामुळे या रुग्णाला आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या. यानंतर संबंधित रुग्णाला शिफ्ट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. मात्र, आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यानच या रुग्णाचा मृत्यू झाला. यबाबत माहिती मिळताच नातेवाईकांचा राग अनावर व त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. एका नातेवाईकाने ऑक्सिजन सिलिंडर उचलून जमिनीवर आदळले. यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. तर याच वार्डमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या फराह नामक डॉक्टर बालंबाल बचावल्या. यानंतर भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय काम सुरु करणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. हेही वाचा… 8 तास ना पाणी, ना खाणं, ना टॉयलेट; फक्त कोरोनाग्रस्तांसाठी झटतायेत डॉक्टर मालेगावचे पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पोलिस यंत्रणा रुग्णालयात तैनात करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर काम बंद मागे घेण्यात आले. दरम्यान या आधी एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील रुग्णालयात असाच गोंधळ घातला होता. संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.