8 तास ना पाणी, ना खाणं, ना टॉयलेट; स्वत:चा जीव धोक्यात टाकून फक्त कोरोनाग्रस्तांसाठी झटतायेत डॉक्टर

8 तास ना पाणी, ना खाणं, ना टॉयलेट; स्वत:चा जीव धोक्यात टाकून फक्त कोरोनाग्रस्तांसाठी झटतायेत डॉक्टर

कोरोना (Coronavirus) रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स PPE KIT घातल्यानंतर 8 ते 12 तास पॅक होऊन जातात. ज्यामुळे ते आपल्या मुलभूत गरजाही भागवू शकत नाहीत. 

  • Share this:

इंदोर, 19 एप्रिल : कोरोनाग्रस्तांवर (Coronavirus) उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सची ड्युटी एखाद्या कमांडो ट्रेनिंगपेक्षा कमी नाही. कारण तहान लागली तर ना तुम्ही पाणी पिऊ शकत, ना टॉयलेटला जाऊ शकत. याला कारण म्हणजे पीपीई किट (PPE KIT). जे एकदा घातल्यानंतर 8 ते 12 तास काढणं शक्य नाही. एक क्षणही त्यांनी खबरदारी राखली नाही तर त्यांचा जीव धोक्यात पडू शकतो.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर पीपीई किट वापरत आहेत. एक विशेष प्रकारचा ड्रेस घालून कोरोना रुग्णांच्या जवळ ते जात आहेत, जेणेकरून त्यांना कोरोनाव्हायरसची लागण होणार नाही. मात्र हा ड्रेस घालण्यात आणि काढण्यातच एक तास जातो. एकदा हा ड्रेस घालून काढला की तो पुन्हा वापरता येत नाही, नाहीतर संक्रमणाचा धोका असतो. त्यांना दुसरा ड्रेस घालावा लागतो, मात्र अशा ड्रेसची कमतरता आहे. त्यामुळे इंदोरमधील डॉक्टर ड्युटीवर असताना 8 ते 12 तास हा ड्रेस काढत नाहीत, ज्यामुळे त्यांना स्वत:च्या मुलभूत गरजाही बाजूला ठेवाव्या लागत आहेत. हा ड्रेस घातल्यानंतर 8 तास ना हे डॉक्टर पाणी पित, ना काही खात, ना टॉयलेटला जात. स्वत:चा जीव धोक्यात घालत हे डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी झटत आहेत.

हे वाचा : चिंता वाढली! 29 दिवस आयसोलेशनमध्ये राहिलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे एमआरटीबी हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी संध्या कुशवाह यांनी सांगितलं, "एका नर्सची दिवसाची ड्युटी 6 तासांची करण्यात आली आहे. मात्र किट घालणं, काढणं आणि हॉटेलपर्यंत येण्यातच त्यांना 2 तासांचा वेळ लागतो. ड्युटीदरम्यान ना ते पाणी पिऊ शकत ना काही खाऊ शकत. 5 दिवस काम केल्यानंतर त्यांना 15 दिवस त्यांना स्वत:ला आयसोलेट करून घ्यावं लागतं, जेणेकरून त्यांना कोरोनाव्हायरसची लागण तर झाला नाही, हे समजू शकेल"

अशी परिस्थिती फक्त एमआरटीबी हॉस्पिटलची नाही तर शहरातील सर्व कोविड-19 हॉस्पिटल्समधील आहे. एमआरटीबी रुग्णालयाचा विचार करता, इथं 45 लोकांचा स्टाफ आहे. एका वॉर्डात 4 नर्सची ड्युटी लावली जाते. अशा प्रकारे 3 वॉर्डात 5 दिवस 12 कर्मचारी असतात. 5 दिवसांनंतर ते क्वारंटाइन होतात आणि त्यांच्या जागी इतर 12 कर्मचारी ड्युटीवर येतात. इंदोरमध्ये 17 रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपादन - प्रिया लाड

First published: April 19, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या