Home /News /maharashtra /

'काय झाडी, काय डोंगार' फेम आमदार होणार का पर्यटन मंत्री? का भाजपकडून गेम?

'काय झाडी, काय डोंगार' फेम आमदार होणार का पर्यटन मंत्री? का भाजपकडून गेम?

मुख्यमंत्री झालेले शिंदे मंत्रिमंडळात घेणार की भाजपच्या कोट्यातून सोलापूरला मंत्रिपद देऊन बापुंना केवळ झाडी आणि डोंगर पाहून समाधान मानावे लावणार

मुख्यमंत्री झालेले शिंदे मंत्रिमंडळात घेणार की भाजपच्या कोट्यातून सोलापूरला मंत्रिपद देऊन बापुंना केवळ झाडी आणि डोंगर पाहून समाधान मानावे लावणार

मुख्यमंत्री झालेले शिंदे मंत्रिमंडळात घेणार की भाजपच्या कोट्यातून सोलापूरला मंत्रिपद देऊन बापुंना केवळ झाडी आणि डोंगर पाहून समाधान मानावे लावणार

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी गोवा, 02 जुलै :  बंडखोरी नाट्याच्या राजकारणात चर्चेत आलेल्या 'काय झाडी...काय डोंगार...'फेम शहाजीबापु पाटील ( Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil ) यांना पर्यटनमंत्री करा असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. शहाजी बापुंसारख्या खमक्या नेत्याला  मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या मतदार संघातली जनताही करत आहे. मात्र भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात सुभाष देशमुख यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असून बापूना केवळ डोंगर झाड्या पाहण्यात समाधानी व्हावे लागणार आहे. बंडखोर आमदारांच्या गटात गुपचूप सामील होऊन गुवाहाटी गाठणारे सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे कार्यकर्त्याने केलेल्या फोनमुळे चर्चेत आले. गुवाहाटीचे रसभरीत वर्णन बापूंच्या इतकं आतापर्यंत कोणी केले नसेल असे त्यांचे फोनवरील संभाषण व्हायरल झाले. गावरान भाषेतल्या ढंगातले हे संभाषण पुढे आले आणि राजकीय तणावपूर्ण स्थितीत शहाजीबापुचे नाव राज्यभर गाजले. आता याच बापुंना पर्यटन मंत्री करा असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे बापू मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या कोट्यातून सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.त्यामुळे प्रादेशिक समतोल राखताना शहाजीबापूंच्या वाट्याला पुन्हा दुष्काळच येऊ शकतो. (गुलाबासारखी स्कीन होईल गुलाबी-मुलायम; घरच्या-घरी गुलाब पाकळ्यांचा असा करा वापर) शहाजीबापु यांनी जसं काय झाडी काय डोंगार, काय हाटील.. गुवाहाटीचे रसभरीत वर्णन केले तसे त्यांच्या राजकीय संघर्षाचेही केले. जमिनी विकून राजकारण करावे लागल्याचे त्यांनी सांगितलं. तर काँग्रेसमध्ये असताना राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन भाषणे ठोकल्याचे सांगत. राजकीय जीवनात किती कष्ट घेतले ते या संभाषणात त्यांनी नमूद केले. त्यामुळे बापूंचा हा संघर्ष नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्यानात ठेऊन त्यांची मंत्री मंडळात वर्णी लावणार का हे पाहावे लागेल. शेतकरी कामगार पक्षाचे भाई गणपतराव देशमुख यांच्या रूपाने या मतदार संघाला यापूर्वी मंत्रिपद मिळाले होते. रोजगार हमी योजनेच्या मंत्रिपदाचा वापर करून त्यांनी या मतदारसंघात चांगले काम केले. त्यानंतर आता पुन्हा मंत्रिपदाची संधी या मतदार संघाला चालून आली आहे. बापूंच्या रूपाने ती पूर्ण झाली तर या मतदार संघाचा कायापालट होऊ शकतो. काय झाडी.. म्हणत एकनाथ शिंदे यांनाही भुरळ घालणारे बापुंना आता मुख्यमंत्री झालेले शिंदे मंत्रिमंडळात घेणार की भाजपच्या कोट्यातून सोलापूरला मंत्रिपद देऊन बापुंना केवळ झाडी आणि डोंगर पाहून समाधान मानावे लावणार हेच पाहणे महत्वाचे असणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या