
त्वचा चमकदार होण्यासाठी - गुलाबाच्या तीन-चार पाकळ्या काढून घ्या आणि पाऊण कप कच्च्या दुधात दोन-तीन तास भिजवा. यानंतर, त्यांना बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा आणि त्यात एक चतुर्थांश चमचा मध मिसळा आणि चेहऱ्याला लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा.

डेड स्कीन काढण्यासाठी - अर्धा कप गुलाबाच्या पाकळ्या धुवून बारीक वाटून घ्या आणि त्यात दोन चमचे गुलाबजल आणि एक चमचा चंदन पावडर मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार हालचालीत दोन मिनिटे मसाज करा. नंतर वाळल्यावर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

कोरडेपणा कमी करण्यासाठी - गुलाबाच्या 3-4 पाकळ्या धुवून बारीक करा. या पेस्टमध्ये एक चमचा दुधाची साय आणि एक चमचा गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्याने धुवा.

टॅनिंग कमी करण्यासाठी - अर्धा कप गुलाबाच्या पाकळ्या आणि संत्र्याची साल घ्या आणि त्यांना एकत्र बारीक करून पेस्ट बनवा. त्यानंतर अर्धा चमचा मध आणि एक चमचा दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी पाण्याने धुवा.

त्वचेचा रंग उजळण्यासाठी - गुलाबाच्या तीन किंवा चार पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. त्यानंतर दोन चमचे गुलाबपाणी, एक चमचा कच्चे दूध आणि पाव चमचा हळद एकत्र करून चेहरा आणि मानेला लावा. त्यानंतर वाळल्यावर धुवा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)




