मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अडीच किमी लागली वाहनांची रांग

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अडीच किमी लागली वाहनांची रांग

वाहतूक अगदीच धिम्या गतीने पुढे सरकत आहे.

वाहतूक अगदीच धिम्या गतीने पुढे सरकत आहे.

वाहतूक अगदीच धिम्या गतीने पुढे सरकत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India

रायगड, 30 ऑक्टोबर : दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले लोक पुन्हा आपापल्या शहरात परतत असताना ट्रॅफिक जाममुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच आज मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव बाजारपेठ इथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत.

तब्बल अडीच किमीची रांग -

प्रत्येक सणासुदीला महामार्गावर ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत असते. आज या वाहतूक कोंडीमुळे माणगाव शहरापासून अडीच किलो मीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. तसेच दिवाळीनिमित्त कोकणात गेलेले पर्यटक आणि चाकरमानी परतीच्या मार्गावर असल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात -

रविवार हा सुट्टीचा दिवस असून नेहमीपेक्षा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने महामार्गावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळेच ठिकठिकाणी महामार्ग ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडला. अशातच मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटात विचित्र अपघात घडला आहे. एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - गुजरातमध्ये पुल अपघातात 60 लोकांचा जीव गेल्याची भीती; लोकांचा टाहो, पहिला Video समोर

स्थानिकांना वाहतूक कोंडीचा फटका - 

वाहतूक अगदीच धिम्या गतीने पुढे सरकत आहे. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासनतास थांबून कासवगतीने पुढे सरकनाऱ्या वाहनांमुळे प्रवाशी मात्र अस्वस्थ झाले होते. काही वाहने बंद पडू लागली होती त्यामुळे देखील वाहतूक कोंडी आणखी वाढत होती. याचा फटका स्थानिकांनाही बसत आहे. त्यांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Goa, Mumbai, Traffic