मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Aryan Khan: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट

Aryan Khan: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट

Aryan khan gets clean chit from ncb in cordelia cruises drug party case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

Aryan khan gets clean chit from ncb in cordelia cruises drug party case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

Aryan khan gets clean chit from ncb in cordelia cruises drug party case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

  • Published by:  Sunil Desale

प्रीती सोमपुरा, वरिष्ठ संपादक

मुंबई, 27 मे : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा (Cordelia Cruise drug party case) एनसीबीने (NCB) पर्दाफाश केला आणि एकच खळबळ उडाली. याच क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झालं. आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हायप्रोफाईल अशा कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यन खान याला क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. आर्यन खानसह एकूण 6 जणांना एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

पुराव्यांअभावी साह जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे तर इतर 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दतवाढ दिलेली. हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ 29 मे रोजी संपुष्टात येणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण?

2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 दिवसांनी आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका झाली. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.

वाचा : केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल

नवाब मलिकांनी केला होता दावा

आर्यन खानला अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पत्रकार परिषद घेत एनसीबीवर वारंवार आरोप करत होते. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आर्यन खानला अडकवण्याचा प्लॅन होता असंही म्हटलं होतं. आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता.

वाचा : "मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला.."; राजे अन् CM मध्ये नेमकी काय झालेली चर्चा

मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Aryan khan, Drug case, NCB