नागपूर, 22 मे : गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण यावरुन चर्चा सुरु आहेत. याच संदर्भात अजित पवारांनी कोल्हापुरातील मेळाव्यात राष्ट्रवादीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचे म्हटलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. ‘आपण महाविकासआघाडीचे घटकपक्ष आहोत. महाविकासआघाडी मजबूत ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पण तुमची जास्त ताकद असेल तर तुम्हाला महत्त्व दिलं जाईल. याआधी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा आपल्यापेक्षा जास्त असायच्या. आम्हाला बार्गेनिंग करताना लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यायला लागायची. आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत, कारण ते 44 आहेत आम्ही 54 आहोत आणि उद्धव ठाकरेंची सेना 56 होती’, असं अजित पवार म्हणाले होते. लोकसभा-विधानसभेला महाविकासआघाडी एकत्र, पण… पवारांनी सांगितला BMC चा प्लान पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांच्या या वक्तव्याच्या सूरात सूर मिसळला आहे. महाविकासआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सध्या मोठा पक्ष आहे, असं मोठं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. सध्या विधानसभेतील परिस्थिती पाहता राष्ट्रवादी क्रमांक एक तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष आहे. तर ठाकरे गट 3 नंबरवर असल्याचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनीही या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते, त्यावेळी ते मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने आमदार-खासदार आहेत, त्यामुळे आम्ही मोठे भाऊ आहोत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा केलाय, त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीने ठाकरे गटाला आरसा दाखवलाय, त्यामुळे ठाकरे गटाला हे वक्तव्य मान्य होणार का? हे पाहावं लागणार आहे. अजनी वन, कोराडी ते कोल वॉशरी, विदर्भ दौऱ्यात आदित्य ठाकरेंची पर्यावरणासाठी बॅटिंग