जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mahavikas Aghadi : ठाकरे गटातील घडामोडींमुळे मोठ्या नेत्याचं पद धोक्यात, अजितदादांनीही टाकली गुगली

Mahavikas Aghadi : ठाकरे गटातील घडामोडींमुळे मोठ्या नेत्याचं पद धोक्यात, अजितदादांनीही टाकली गुगली

ठाकरे गटात घडामोडी, मोठ्या नेत्याचं पद धोक्यात

ठाकरे गटात घडामोडी, मोठ्या नेत्याचं पद धोक्यात

विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ घटलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जून : विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ घटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या समान झाली आहे, त्यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा आहे. सध्या विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेतेपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. अंबादास दानवे यांच्याकडे परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. मात्र आमदार मनिषा कायदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या शिवसेनेचं संख्या बळ एकने कमी झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या समान झाली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चढाओढ लागल्याचं बोललं जातंय. यावर अजित पवारांना विचारलं असता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. पुन्हा नवा सर्व्हे, मुख्यमंत्रिपदी फडणवीसांना पसंती, भाजपला इतक्या जागा मिळणार! ‘विधानसभा, विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षनेते पद देण्याची वेळ येते त्यावेळेस ज्यांच्या जागा सर्वात जास्त आहेत त्यांना ते विरोधी पक्षनेते पद देतात. 2014 ला राष्ट्रवादीचे 41 आणि काँग्रेसचे 42 निवडून आले, त्यावेळी काँग्रेसकडे 5 वर्ष विरोधी पक्षनेते पद होतं. आम्ही याबद्दल विचार केला नाही, पण तुम्ही गोष्ट लक्षात आणून दिल्यामुळे विचार नक्की करू,’ असं अजित पवार म्हणाले. आमदार मनिषा कायंदेंच्या पक्षांतरानंतर विधान परिषदेतील राजकीय बलाबल पाहिल्यास भाजपचे 22, ठाकरे गटाचे 9, राष्ट्रवादीचे 9, काँग्रेसचे 8 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आमदार आहेत. मनिषा कायंदे शिंदेंसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या समान झाली आहे. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र आपल्या पदाला कोणताही धोका असणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेची संख्या तांत्रिकदृष्ट्या जास्त आहे. जे पक्षातून गेले आहेत, ते पक्षाचे अधिकृत नाहीत, त्यामुळे कुणी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल, असं वाटत नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. सध्या विधान परिषदेचं उपसभापती आणि विरोधी पक्षनेते पद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत, तर अंबादास दानवेंकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. मात्र आता ठाकरेंच्या आमदारांची संख्या घटल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राआधी कर्नाटकचाही सर्व्हे, त्या संस्थेचे आकडे खरे ठरले होते का खोटे?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात