• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'लडनेवालें बाप का बेटा हूँ' : उद्धव ठाकरे यांनी सोनियांच्या उपस्थितीत ममतादीदींना सांगितलं

'लडनेवालें बाप का बेटा हूँ' : उद्धव ठाकरे यांनी सोनियांच्या उपस्थितीत ममतादीदींना सांगितलं

'(केंद्र सरकारला) घाबरायचं की लढायचं हे आधी ठरवा', असं सुरुवातीलाच सांगत उद्धव ठाकरे यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी आज काँग्रेस प्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. सोनिया गांधींनी (Sonia gandhi) ही बैठक (Opposition party meeting) आयोजित केली होती. या बैठकीला पहिल्यांदा बोलायची संधी देण्याची विनंती उद्धव यांनी केली आणि त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना विनंती केली. त्यावर उद्धव ठाकरे याचं कौतुक करत ममता दीदी म्हणाल्या, "अच्छी फाईट दे रहें हो आप". यावर क्षणार्धात 'लडनेवालें बाप का लडनेवाला बेटा हूँ', असं म्हणत ठाकरे यांनी सोनिया गांधींसमोरच राजकीय इरादे स्पष्ट केले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस प्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. GST मध्ये राज्यांचा वाटा आणि NEET, JEE परीक्षांचं आयोजन हे मुद्दे या बैठकीत प्रामुख्याने चर्चेला होते. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. '(केंद्र सरकारला) घाबरायचं की लढायचं हे आधी ठरवा', असं सुरुवातीलाच सांगत उद्धव ठाकरे यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला. या बैठकीला काँग्रेसचे चार, तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी उपस्थित होते.NEET, JEE परीक्षांबाबत केंद्र सरकारने धोरण कायम ठेवलं तर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी ममता बॅनर्जी यांनी दाखवली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीही ममतादीदींची री ओढली. देशभरात अद्यापही कोरोनाचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात JEE आणि NEET परीक्षांना विरोध केला जात आहे.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: