मुंबई, 04 जुलै : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना राज्याची आर्थिक सिस्टम पूर्णपणे ढासळली आहे. राज्याकडे सध्या पैसे नाहीत आणि केंद्राकडून पैसे येत नसल्याची धक्कादायक माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी वेतन नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.
पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सरकारला कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची वेळ आली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तर काल शिक्षण विभागाने जारी केलेल्या जीआरनुसार, आता शिक्षण विभाग मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांसाठी 22 लाख किमतीची 5 वाहनं खरेदी करणार आहेत. त्यामुळे जेव्हा सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत तिथे हा खर्च कसा निघणार असा प्रश्न आहे.
पुण्यात कोरोनाचा नाश करण्यासाठी महापौरांनी अजित पवारांकडे केल्या या मागण्या
राज्य सरकारची आर्थीक परिस्थिती नाजूक आहे. पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या साठी 25 लाख रुपये किंमतीचा गाडी खरेदीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या मान्यतेनुसार शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांच्यासाठी वाहन खरेदी करता येणार आहे.
राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, 'दत्ताकाका' यांचं कोरोनामुळे निधन
मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळे व्यवसाय, व्यापार बंद असल्यामुळे राज्यात आर्थिक अडचण वाढत आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्याचे पैसे देण्यासाठी राज्याला कर्ज काढावं लागणार आहे. यावर केंद्रातून पैसे येत नसल्याने खळबळाट वाढतच आहे. यावर आता सरकार काय पावलं उचलणार हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.
कोरोना हरणार देश जिंकणार! अशीच आहे पुण्याच्या या मुलीची कोव्हिड विरोधातली लढाई
खरंतर, राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दारू विक्री करण्यासाठी परवाणगी देण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी लोकांचे व्यापार सुरु व्हाये यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. पण त्याने घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि कोरोनाचा प्रकोपही वाढण्यास सुरुवात झाली. त्यात आता पावसाळा आला असल्याने सरकारला योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
संपादन - रेणुका धायबर
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.