मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Weather Update: पुण्याला आज धो धो धुणार; राज्यात कुठल्या कुठल्या भागात पावसाचा Alert?

Weather Update: पुण्याला आज धो धो धुणार; राज्यात कुठल्या कुठल्या भागात पावसाचा Alert?

राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार

राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार

राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार

  मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यात मागच्या चार दिवसांपासून काही जिल्ह्यात पावसाने उसंत दिला आहे यामुळे काही भागातील आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली.( Maharashtra rain) दरम्यान पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

  हवामान विभागाच्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात काल (दि.15) कुठे संततधार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. या पावसाने जिल्हातील नदी-नाले पुन्हा तुंडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान झालेल्या पावासाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट येईल अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा जिल्हाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आल्याने पावसाची पुन्हा शक्यता आहे.

  हे ही वाचा : प्रचंड गर्दीचा दिवस, पुणे-नाशिक अन् मंचर-भीमाशंकर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 10 KM पर्यंत वाहनांच्या रांगा

  दरम्यान भंडार जिल्ह्यात झालेल्या पावसाने वैनगंगा नदी इशारा पातळीवर पोहचली असून वैनगंगा नदीला नियंत्रित करण्याकरिता गोसीखुर्द धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावाला धोकादायक इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. विशेष म्हणजे संभाव्य पुर परिस्थिति लक्षात घेता जनतेसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक संदेश ही जारी करत सुरक्षित राहाण्याचे आवाहन केले आहे.

  गडचिरोलीत आलापल्ली-भामरागड मार्ग पुन्हा एकदा बंद

  मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. दरम्यान पुन्हा झालेल्या पावसाने आलापल्ली- भामरागड मार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे, चार दिवस हा मार्ग बंद होता. 12 तारखेला हा मार्ग वाहतुकासाठी मोकळा झाला होता, मात्र छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पार्लकोट नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्ग वाहतुकासाठी बंद झाला आहे.

  हे ही वाचा : पुणे : मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची भीती

  नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

  नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची विश्रांती पाहायला मिळतेय,  मात्र रात्री पासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक नदी-नाले धरण वाहू लागले आहेत.

  वर्ध्यात पावसाची संततधार सुरू

  वर्धा जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र पूर परिस्थिती नाही, नागरिक सुरक्षित आहेत, रस्तेही सुरळीत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Pune news, Pune rain, Rain fall, Rain flood, Weather update

  पुढील बातम्या