मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे : मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची भीती

पुणे : मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची भीती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

हवामान विभागाने पुढचे 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे, 11 ऑगस्ट : हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.  हवामान विभागाने पुढचे 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्हांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातही पावसाचं बॅटिंग सुरू आहे. खडकवासला धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालं आहे. पाऊस वाढल्याने विसर्ग 26 हजार 809 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला आहे. मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी पात्रात पार्क केलेली वाहनं लोकांनी वेळेत हटवावी, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. Weather Update : Long Weekendच्या प्लॅनमध्ये पावसाचा खो! पुढचे 5 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा मध्यरात्रीपर्यंत नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे प्रशासनाचे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार ८०९ क्यूसेक्स करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी  नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असंही सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे कोल्हापूरातील तुळशी धरण परिसरात आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने धरण ९३ टक्के भरले असून धरणाच्या तीन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या