मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अस्मानी संकटाने मृत्यूतांडव, आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता, 3248 जनावरं दगावली

अस्मानी संकटाने मृत्यूतांडव, आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता, 3248 जनावरं दगावली


मदत व पुनर्वसन विभागाने आज  25 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत माहिती प्रसिद्ध केली आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने आज 25 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत माहिती प्रसिद्ध केली आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने आज 25 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत माहिती प्रसिद्ध केली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 जुलै : कोकण (konkan flood), कोल्हापूर (kolhapur flood), सांगली, सातारा आणि रायगडमध्ये (raigad konkan landslide) अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. पूरग्रस्त भागात आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 जण अजूनही बेपत्ता आहे. या दुर्घटनेत तब्बल 3248 जनावरं दगावल्याची मन सून्न करणारी माहिती समोर आली आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने आज  25 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत माहिती प्रसिद्ध केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतून सुमारे 2 लाख 30 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. आतापर्यंत एकूण 149 जणांचे मृत्यू झाले आहे. तसंच 50 जण जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या दुर्घटनांमध्ये अजूनही 100 लोक बेपत्ता आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर या अस्मानी संकटात  3248 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात (Satara District) झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

पत्नी सेक्सला नकार देण्यामागे ही देखील कारणं असू शकतात, चिडचिड नको तर..

सातारा जिल्ह्यात एकाचवेळी झालेलं भूस्खलन, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि पुराचं साम्राज्य अशा वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मिळून 40 मृतदेह आतापर्यंत सापडले असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. यातील सर्वाधिक मृत्यू आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या भागात झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 7 जण अद्यापही बेपत्ता असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

भूस्खलन झालेल्या गावांमध्ये अजूनही शोधकार्य सुरूच आहे. एक 8 महिन्यांचं बाळदेखील अद्याप ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती मिळत असून सर्व शक्तीनिशी प्रशासन खोदकाम करत आहे. मात्र खोदकामात सतत पडणाऱ्या पावसाचा मोठा अडथळा येत असल्याचं चित्र आहे. पावसामुळे चिखलाचं प्रमाण वाढत असून बचाव कार्याचा वेग मंदावत आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत दुपारपर्यंत 5 मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. अजूनही या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा असून तो उपसायला एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकप्रियता मिळवण्यासाठी लगेच घोषणा नाही - मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूण शहराची पाहणी केली. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली.

IPL 2021 : आयपीएलला 19 सप्टेंबरपासून सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.

तसंच, 'वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.   प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

First published:

Tags: Death, Satara