मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Amaravati Railway : मालवाहतूक रेल्वे गेली अन् रेल्वे रूळ तुटला, प्रवासी रेल्वेची मोठी दुर्घटना टळली

Amaravati Railway : मालवाहतूक रेल्वे गेली अन् रेल्वे रूळ तुटला, प्रवासी रेल्वेची मोठी दुर्घटना टळली

तरूणाच्या माहितीने रेल्वे प्रशासन तातडीने जागे होत परस्थिती नियंत्रणात आणली. मालवाहतूक गाडी गेल्यावर रेल्वे रूळ तुटल्याची माहिती समोर आली आहे.

तरूणाच्या माहितीने रेल्वे प्रशासन तातडीने जागे होत परस्थिती नियंत्रणात आणली. मालवाहतूक गाडी गेल्यावर रेल्वे रूळ तुटल्याची माहिती समोर आली आहे.

तरूणाच्या माहितीने रेल्वे प्रशासन तातडीने जागे होत परस्थिती नियंत्रणात आणली. मालवाहतूक गाडी गेल्यावर रेल्वे रूळ तुटल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amaravati Maharashtra, India

अमरावती, 16 जुलै : अमरावती शहरापासून १० किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेटवर मोठी दुर्घटना टळली आहे. या मार्गावरील रेल्वे रुळ तुटला होता, एका जागरूक तरुणाने दिलेल्या माहितीमुळे मोठा अपघात टळला आहे. अन्यथा पुढच्या काही तासात रेल्वे रुळ तुटून मोठी घटना घडली असती. त्या तरूणाच्या माहितीने रेल्वे प्रशासन तातडीने जागे होत परस्थिती नियंत्रणात आणली. मालवाहतूक गाडी गेल्यावर रेल्वे रूळ तुटल्याची माहिती समोर आली आहे. (Amaravati Railway)

अमरावती शहरापासून 10 किमी अंतरावर वलगार रेल्वे गेट आहे. या रेल्वे गेटवरून काही मिनीटांपूर्वी मालवाहतूक गेली होती. या रूळावरून एक मालगाडी गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाल्याच एक जागरूक तरुणाच्या निदर्शनास आले. त्याने ही माहिती फोन द्वारे रेल्वे स्टेशनला कळवली. यानंतर रेल्वे प्रशासनाने दखल घेत मध्य रेल्वे आणि अमरावती रेल्वे प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचत पाहणी केली.

हे ही वाचा : 'मला सरप्राईज गिफ्ट मिळालं', फडणवीसांनी जाहीर सभेत बोलून दाखवली नाराजी

दरम्यान या घटनेमुळे दोन प्रवासी रेल्वेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. याचबरोबर ज्या रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडले आहे त्या रेल्वे वलगावजवळ थांबवल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बडनेरा येथील रेल्वे विभागाकडून युद्ध स्तरावर तुटलेला रेल्वे ट्रक दुरुस्तीचे काम सुरू केले. दरम्यान या रुळाची तात्पुरत्या स्वरुपात दुरूस्ती करून वाहतुक सुरळीत करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सूचीत करण्यात आले आहे.

रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू

या रूळवरून एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाला. ही घटना एका जागरूक तरुणाला दिसली. त्याने ही माहिती फोनद्वारे रेल्वे स्टेशन ला कळवलं. अमरावती रेल्वे प्रशासन तात्काळ कामाला लागलं. सध्या दोन प्रवासी रेल्वेचे वेळापत्रक या ट्रॅक कामामुळे लांबले आहे. दोन रेल्वे वलगावजवळ थांब आहेत. बडनेरा येथील रेल्वे विभागाकडून युद्ध स्तरावर तुटलेला रेल्वे ट्रक दुरुस्तीचे काम सुरू आहे.

हे ही वाचा : संजय राऊत आणि भुजबळ बावचाळले, बावनकुळेंचा घणाघाती प्रहार

नेमकं काय घडलं

या रुळावरून एक मालगाडी गेली. त्यानंतर एका युवकाला ट्रॅक तुटलेला दिसला. तुटलेल्या रुळावरून दुसरी प्रवासी गाडी आली असती, तर अपघात होण्याची शक्यता होती. पण, तत्पूर्वी युवकानं रेल्वे विभागाला ही माहिती दिली. त्यामुळं रेल्वेचे कर्मचारी ट्रॅकवर पोहचले. तो ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. तोपर्यंत इतर दोन प्रवासी रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत. ट्रॅक दुरुस्त झाल्यानंतर रेल्वेगाड्या सुरू होतील.

First published:

Tags: Amravati, Indian railway, Railway track, अमरावतीamravati, महाराष्ट्र amravati