नागपूर, 16 जुलै : ‘संजय राऊत बावचळले आहे, म्हणून त्यांना नागपुरात यावं लागलं. उद्धव ठाकरे सरकार असतं तर गडचिरोलीमध्ये पूर आल्यावर फेसबुक लाईव्ह केलं असतं, पण शिंदे आणिफडणवीस रात्रीच थेट गडचिरोलीत पोहोचले आणि पाहणी केली, असं म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टिका केली. ‘ओबीसी आरक्षणाबाबत वडेट्टीवार आणि भुजबळ साहेब अडीच वर्षे झोपले होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनंही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे काहीच केलं नाही. पहिला आयोग तयार केला त्यांना पैसे दिले नव्हते. भुजबळ आणि वडेट्टीवार मोर्चे काढत राहिले, ओबीसी आरक्षणाचा फुटबॅाल केला, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ‘सर्वोच्च न्यायालयाने लाथाळल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बांठीया आयोग नेमला. बांठीया आयोगाचं ९० टक्के काम महाविकास आघाडी सरकारमध्ये झालंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय झाल्या आहेत. आता शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करण्याचा अधिकार भुजबळ यांना नाही. हा डाटा राजकीय आरक्षणासाठी आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यामुळे भुजबळ बावचळले आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. शिंदे - फडणवीस सरकार ओबीसी सामाजाला नक्की न्याय देणार आहे. वडेट्टीवार आणि भुजबळ यांनी काही काळ शांत बसावं, ओबीसींना राजकीय आरक्षण नक्की मिळेल. हे सरकार १०० टक्के ओबीसींना आरक्षण मिळेल. १९ तारखेला सुनावणी आहे, त्यात योग्य बाजू मांडणार. मध्य प्रदेशच्या धर्तीवर रिपोर्ट तयार झाला आहे, मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसांना आरक्षण मिळेल, असंही बावनकुळे म्हणाले. संजय राऊत हे बावचाळले आहे, त्यामुळे त्यांना नागपूरमध्ये यावं लागलं. एकनाथ शिंदे - फडणवीस सरकार येवढं काम करेल की यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, अशी टोलाही बावनकुळे यांनी राऊतांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.