नवी दिल्ली, 8 जुलै : महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आज रात्री या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती आणि किती खाती मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे-फडणवीस अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेणार आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे. कारण उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन मुख्यमंत्री दिल्लीहून पुण्याला जाणार आहेत. पुण्यावरूनच एकनाथ शिंदे रविवारी पहाटे पंढरपूरला जातील. तिकडे मुख्यमंत्री आषाढी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करतील.
महाराष्ट्र के नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उप-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी से भेंट की और उन्हें शुभकामनाएं दीं। मुझे विश्वास है कि श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में आप दोनों पूरी निष्ठा के साथ जनता की सेवा कर महाराष्ट्र को विकास की नई ऊँचाइयों पर ले जाएंगे। pic.twitter.com/hmuO8SSwg8
— Amit Shah (@AmitShah) July 8, 2022
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांसह बंड केलं, त्यामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीला आठवडा झाला असला तरी अजूनही मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde