Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांना भेटून संजय राऊत शरद पवारांकडे! औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव?

मुख्यमंत्र्यांना भेटून संजय राऊत शरद पवारांकडे! औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी महाविकासआघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi) गुरूवारी बहूमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावायला सांगितलं आहे. त्याआधी मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. संजय राऊत (Sanjay Raut) मातोश्रीवरून निघाले असून ते शरद पवारांना (Sharad Pawar) भेटण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी महाविकासआघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi) गुरूवारी बहूमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावायला सांगितलं आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी आज संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे, पण त्याआधीच मातोश्रीवर जोरदार बैठका सुरू आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापाठोपाठ सुभाष देसाई मातोश्रीवरून रवाना झाले आहेत. तर अरविंद सावंत आणि विनायक राऊत अजूनही मातोश्रीवर आहेत. मातोश्रीवरून रवाना झालेले राऊत शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, त्याआधी मातोश्रीवर झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत कॅबिनेटमधल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. काल संसदीय कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल असं सांगितलं होतं. औरंगाबादच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. हा प्रस्ताव मंजूर करून केंद्राला अडचणीत आणण्याची शिवसेनेची रणनिती असल्याचं सांगितलं जात आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावावरून महाविकासआघाडीमध्ये दुही मांडण्याची शक्यता आहे. काँग्रेस या प्रस्तावाला विरोध करण्याच्या तयारीमध्ये आहे. तर राष्ट्रवादीने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. जर काँग्रेसने विरोध केला तर महाविकासआघाडीमध्ये खडाजंगी होण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचा विरोध झुगारून मुख्यमंत्र्यांनी नामकरणाचा प्रस्ताव मांडला तर फ्लोअर टेस्टला सामोरं जायच्या आधीच शिवसेनेचा हा सत्तेतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लान असणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Sanjay raut, Sharad pawar अध्यक्ष, Uddhav thackeray

    पुढील बातम्या