Live Updates: आणखी 2 आमदार! फुटीर शिवसेना गटाला आवश्यक 37 आमदार गुवाहाटीत

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचे LIVE UPDATES

 • News18 Lokmat
 • | June 23, 2022, 21:38 IST |
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:21 (IST)

  बंडखोर आमदारांचं नरहरी झिरवळांना पत्र
  स्वतंत्र गटाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे
  भरत गोगावले हेच सेनेचे मुख्य प्रतोद - शिंदे

  23:10 (IST)

  आणखी 2 अपक्ष आमदार शिंदेंच्या गळाला
  किशोर जोरगेवार, गीता जैनही शिंदे गटात
  जोरगेवार, जैन रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दाखल
  एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या संख्येत वाढ
  गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन

  22:50 (IST)

  आमदार चिमणराव पाटील गुवाहाटीत, आम्ही कट्टर शिवसैनिक, मात्र राष्ट्रवादीसोबत संघर्ष करून आमचं राजकारण, मविआसोबत आम्हाला मान्य नाही, एकनाथ शिंदे सांगतील ती आमची दिशा, उद्धव ठाकरे हे आमचे नेते, नितीन देशमुखांचा दावा खोटा, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ - चिमणराव पाटील

  22:34 (IST)

  एकनाथ शिंदेंचं ट्विटद्वारे शिवसेनेला प्रत्युत्तर
  कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? - शिंदे
  'तुमची बनवाबनवी, कायदा आम्हालाही कळतो'
  'व्हीप विधानसभा कामासाठी लागतो,बैठकीसाठी नाही'
  यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल - शिंदे

  21:40 (IST)

  मंत्री अनिल परबांची ईडीकडून चौकशी पूर्ण
  अनिल परबांची ईडीकडून 6 तास चौकशी
  मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी

  21:34 (IST)

  शरद पवार सर्वांना धमक्या देतायत - राणे
  'सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत'
  'ते येणार आणि मनाप्रमाणे मतदान करणार'
  त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठीण होईल - नारायण राणे

  21:28 (IST)

  दादा भुसे, संजय राठोड, रवींद्र फाटक गुवाहाटीत
  विमानतळाच्या व्हीआयपी गेटनं बाहेर पडले
  थोड्याच वेळात हॉटेल रेडिसन ब्ल्यूला पोहोचणार

  21:23 (IST)

  उद्धव ठाकरेंचे सर्व विभागप्रमुखांना आदेश
  'विभागावर मेळावे लावा, शाखा पिंजून काढा'
  'हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्यावर आजही कायम'
  जे गेले त्यांचा विचार करू नका - उद्धव ठाकरे
  आपल्याला आणखी लढायचंय - उद्धव ठाकरे
  'पक्षवाढीवर लक्ष द्या, विभाग मजबूत करा'

  21:20 (IST)

  शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी
  अजय चौधरींकडून नरहरी झिरवळांना पत्र
  विधिमंडळ बैठकीला गैरहजर राहणारे आमदार
  'त्या' आमदारांवर कारवाई करण्याची मागणी

  20:51 (IST)

  'मातोश्री'वरील महत्त्वाची बैठक संपली
  'विभागावर लक्ष द्या, आपण ताकदीनं लढू'
  'शिंदे गटाबाबत मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख नाही'
  'पक्षवाढीवर लक्ष द्या, विभाग मजबूत करा'
  शिवसेनेच्या बैठकीबाबत सूत्रांची माहिती

  मुंबई 23 जून : महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचे LIVE UPDATES