मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्षांना संपूर्ण अधिकार देण्यात आला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता अध्यक्ष घेणार आहेत. राजकीय पक्षाने जो व्हिप जारी त्यावेळी केला होता तो तपासून पाहाणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने सगळे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे हा मुद्दा देखील क्लिअर झाला आहे. एकानाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची धुरा दिल्याची प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे संपूर्ण अधिकारही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे पॉलिटिकल पार्टीचा व्हिप ग्राह्य धरला जाईल. गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरली नाही. त्यांच्या प्रक्रियेबाबत निर्णय दिला आहे. गोगावलेंसाठी जारी केलेला व्हीप अधिकृत आहे असंही राहुल शेवाळे बोलले आहेत.
Maha Political Crisis : आताची सर्वात मोठी बातमी, कोर्टाने 3 धक्के देऊन सुद्धा शिंदे ठरले ‘बाजीगर’दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून घमासान सुरू होतं. अखेर आज सुप्रीम कोर्टानं निकालाचं वाचन करून निर्णय 7 जणांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे 7 जणांचं खंडपीठ निर्णय सोपवण्यात आला. सुप्रीम कोर्टाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंना कोर्टाचा मोठा दणका, भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीरकोर्टाच्या निर्णयानंतर जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे. आज कोर्टानं महत्वाचा निर्णय दिला असून 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे दिला आहे. त्याचबरोबर शिंदे सरकारला कोर्टानं मोठा दिलासा दिला असून निकाल शिंदे यांच्या बाजूनं लागला आहे. त्यामुळं हा आनंदाचा क्षण असून विरोधकांनी आता आदळ आपट करण्यापेक्षा निकालाचं स्वागत करावं असं खोतकर यांनी विरोधकांना सल्ला दिला.