Home /News /maharashtra /

पोलिस दलातील या बातमीनं महाराष्ट्र झाला पुन्हा सुन्न, कोरोनाने घेतला हेड कान्स्टेबलचा बळी

पोलिस दलातील या बातमीनं महाराष्ट्र झाला पुन्हा सुन्न, कोरोनाने घेतला हेड कान्स्टेबलचा बळी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे.

    मुंबई, 21 मे: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. परंतु याच कोरोनाने मुंबईत आणखी एका पोलिसांचा बळी घेतला आहे. मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (वय-57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. हाय रिस्क ऐज ग्रुपमध्ये असल्याने गणेश चौधरी हे एप्रिल महिन्यापासूनच सुट्टीवर होते. हेही वाचा.. कोरोनामुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? ICMR चा मोठा खुलासा दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 13 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या मुंबईत आतापर्यंत 10 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुंबईत शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (वय 32) यांचे गेल्या आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले. ताप व सर्दी यामुळे अमोल कुलकर्णी आजारी होते. कुलकर्णी यांनी रुग्णनिवेदन देऊन घरी राहण्यासाठी अर्ज केला होता. नंतर अमोल कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. अमोल कुलकर्णी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अमोल कुलकर्णी हे राहत्या घरात बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं परंतु, त्याआधीच अमोल कुलकर्णी यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं होतं. हेही वाचा... जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले 'हिच ती वेळ' दरम्यान, 15 मे रोजी मुंबई पोलिस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक भगवान पार्टे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. 45 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या