कोरोना योद्ध्याचं कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत, अवघ्या 4 तासांत आली दु:खद बातमी

कोरोना योद्ध्याचं कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत, अवघ्या 4 तासांत आली दु:खद बातमी

मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे: मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दीपक हाटे (52) हे कोरोना पॉझिटिव्ह होते. कोव्हिड सेंटरमध्ये 10 दिवसांचा उचपार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. कॉलनीतल्या नागरिकांना दीपक हाटे यांचं टाळ्या वाजवून स्वागतही केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या 4 तासांत दीपक हाटे यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं.

दीपक हाटे हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. धक्कादायक म्हणजे पोलीस हवालदार दीपक हाटे यांचंही कोरोनाच्या उपचारानंतर निधन झालं आहे.

हेही वाचा... उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर बनले चेष्टेचा विषय?

दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील आणखी 114 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 2325 वर पोहोचली आहे. दुर्दैवाने एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा आकडा आता 26 वर पोहोचला आहे.

दीपक हाटे हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्यासाठी ज्या पोलिसांची ड्युटी होती, त्यामध्ये दीपक हाटे यांचाही समावेश होता. यानंतर काहीच दिवसात दीपक हाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दीपक हाटे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना वरळीतील राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं.

कोव्हिड सेंटरमध्ये 10 दिवसांचा उचपार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हाटे हे वरळी पोलीस कॅम्पातील त्यांच्या घरी चालत आले.  दरम्यान, हाटे हे घरी परतल्याने शेजाऱ्यांसह कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. हाटे यांनीही सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेले. मात्र रात्री 1 च्या सुमारास हाटे यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णवाहिकेने नायर रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा...चिकनमार्फत पसरेल कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस; शास्त्रज्ञांनी केलं सावध

दीपक हाटे हे चालत कसे काय आले? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला. हाटे आले तेव्हा यांची प्रकृती काहीशी ठिक नव्हती. तरीही त्यांना एका गाडीतून घरापासून लांब 1 किमीवर सोडलं. तिथून ते चालतच घरापर्यंत कसे आलं, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.

First published: May 30, 2020, 3:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या