Home /News /maharashtra /

मोठी बातमी! परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

मोठी बातमी! परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

गुरुवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. परीक्षांसदर्भातला मोठा निर्णय लवकरच होऊ शकतो.

  मुंबई, 4 जून: राज्याततील विद्यापीठांच्या अंतिम वर्षीच्या परीक्षेच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आले आहेत. त्यात गुरुवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 15 जुलैनंतर घेण्याचा आराखडा अमित देशमुख यांनी सादर केला. या आराखड्याला राज्यपालांनी मंजुरीही दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून परीक्षेचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परीक्षा कोविड-19 च्या लॉकडाऊनमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता लवकरच आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे. कोरोनामुळे बदललं हॉटेल्स-रेस्टॉरंट्सचं रूप, पाहा PHOTO विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असं आवाहनही अमित देशमुख यांनी केलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिका.. राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालावर कडाडून टीका केली आहे. विरोधी पक्षाचा सल्ला घेऊन राज्य कारभार करत नाही, याबाबत राज्यपालांनी खुलासा करावा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचेच मंत्री असलेल्या अमित देशमुखांनी राजभवनावर हजेरी लावत आपल्या खात्याचा एक प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विषयावर काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या वेगळ्या भूमिका दिसत असल्याचं चित्र आहे. चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; रिअल हिरो सोनू सूद धावला यांच्याही मदतीला पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघार

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या