चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; रिअल हिरो सोनू सूद धावला यांच्याही मदतीला

चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; रिअल हिरो सोनू सूद धावला यांच्याही मदतीला

'निसर्ग' चक्रीवादळामुळे मुंबईत अडकलेल्या आसाममधील 200 हून अधिक प्रवाशांनाही या अभिनेत्याने मदत केली.

  • Share this:

मुंबई, 4 जून : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या आपल्या चांगल्या कामामुळे सतत चर्चेत आहे. कोरोना विषाणूमुळे देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्याने नुकतीच हजारो प्रभावित स्थलांतरितांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आणि आताही त्याचा पुढाकार कायम आहे.

लॉकडाऊनमध्ये मदत केल्यानंतर आता सोनू सूद याने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबाला मदत करण्यास सुरुवात केली आहे. सोनू सूद आणि त्याच्या टीमने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 28000 लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरविले आहेत.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी मजुरांना घरी परतण्यासाठी अभिनेता व्यवस्था करीत आहेत. तो म्हणाले की, चक्रीवादळाने ग्रस्त नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्थाही सोनू सूदच्या टीमकडून केली जात आहे.

सूद याने एका निवेदनात म्हटले आहे की, “आज आपण सर्वजण कठीण परिस्थितीचा सामना करीत आहोत आणि त्या सर्वांचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एकमेकांना साथ देणे. मी आणि माझ्या टीमने मुंबईच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या 28000 हून अधिक लोकांना भोजन वाटप केले आणि त्यांची विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये राहण्याची व्यवस्था केली. आम्ही खात्री करुन घेत आहोत की ते सर्वजण सुरक्षित आहे. ''

'निसर्ग' चक्रीवादळामुळे मुंबईत अडकलेल्या आसाममधील 200 हून अधिक प्रवाशांनाही या अभिनेत्याने मदत केली. 'निसर्ग' हे चक्रीवादळ मुंबईजवळ अलिबाग येथे धडकले.

हे वाचा-पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघ

First published: June 4, 2020, 8:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading