मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोदी-शाहंचा नवा गेम, पवारांची फिल्डिंगही फसली, महाराष्ट्रातून 16 आमदारांचं मुर्मूंना क्रॉस व्होट

मोदी-शाहंचा नवा गेम, पवारांची फिल्डिंगही फसली, महाराष्ट्रातून 16 आमदारांचं मुर्मूंना क्रॉस व्होट

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. (NCP and Congress MLAs voted for Draupadi Murmu)

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. (NCP and Congress MLAs voted for Draupadi Murmu)

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. (NCP and Congress MLAs voted for Draupadi Murmu)

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 21 जुलै : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतं फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाने मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवारांची खेळी फसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तब्बल 16 आमदार फुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हती तर देशभरातून अनेक मतं फुटल्याचं समोर आलं आहे. भाजपने मुर्मू यांच्या विजयासाठी मोठी तयारी केली होती. देशभरातून विचार करता 104 आमदारांची मत फुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

कोणत्या राज्यातून किती मतं फुटली?

छत्तीसगडमधून 6 आमदार

झारखंडमधून 10 आमदार

आसामचे 22 आमदार

तर देशभरातून 17 खासदार फुटल्याचंही समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा २०० मतांचा दावा योग्य ठरला?

या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मु यांना राज्यातून 200 मतं मिळतील, असा अंदाज शिंदेंनी व्यक्त केला होता. त्यात भाजपा 106, शिंदे गट 50 असून एकूण १७० जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची १६ मतेही राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा १८५ च्या आसपास जातो. २०० चा आकडा शिंदे यांनी सांगितला होता.

या निवडणुकीत एकूण 4800 निर्वाचित खासदार आणि आमदारांनी भाग घेतला. निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत. यांच्यानिमित्ताने देशात पहिल्यांदा एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसल्या आहेत. 27 पक्षांच्या समर्थनासह मुर्मू यांना मोठं मतदान होणार असल्याचं सांगितलं जात होतं. तर दुसरीकडे सिन्हा यांना 14 दलांचं समर्थन आहे.

एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी द्रौपदी मुर्मू  विजयी होतील, असं म्हटलं होतं. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षमर्यादा सोडून किंवा पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

First published:

Tags: BJP, President, Sharad Pawar (Politician)