Home /News /maharashtra /

BREAKING :15 दिवसात धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय शक्य - सूत्र

BREAKING :15 दिवसात धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय शक्य - सूत्र

राज्यपालांबरोबरच्या Secular शब्दावरून झालेल्या 'त्या' पत्रविवादानंतर ठाकरे सरकारने धार्मिक स्थळं उघडण्याबाबत SOP जारी करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

मुंबई, 14 ऑक्टोबर :  मंदिरं उघडण्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणानंतर आता धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतो. याच प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (B S Koshyari) यांच्यात 'तो' प्रसिद्ध पत्रविवादही झालं. आता येत्या 15 दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंदिरं आणि प्रार्थनास्थळं सुरू करावीत, अशी सर्वधर्मीय भक्तांची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाने मंदिरं उघडण्याविषयी गेले काही दिवस या मागणीचा दबाव वाढवला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न केल्याने त्यावरून गदारोळ उठला. 'तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात' असा सवाल राज्यपालपदावरील व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना केल्याने भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठली. राज्यपालांनी संविधानाचा अवमान केला असल्याची टीका झाली. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणीही डाव्या पक्षांनी केली. कोश्यारींच्या या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही खरमरीत शब्दात पत्रोत्तर लिहिलं आणि आपल्या हिंदुत्वाला तुमच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्यकता नाही, असं लिहिलं. मंगळवारी दिवसभर हा पत्रविवाद गाजला. त्यानंतर आता सरकारी सूत्रांनी दिलेल्याम माहितीनुसार, राज्य सरकार धार्मिक स्थळांबाबत SOP तयार करण्याच्या तयारीत आहे. नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण राज्य कोरोनापूर्व काळात होतो, तसे पूर्णपणे खुले होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्याच आठवड्यात सूतोवाच केलं होतं. गेले काही दिवस  सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या राज्यात कमी येत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोनाचा ग्राफ राज्यात तरी खाली येताना दिसतो आहे. त्यामुळे राज्य सरकार धार्मिळ स्थळांवरची निर्बंध हटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण हा निर्णय दसऱ्याअगोदर व्हायची शक्यता नाही.
First published:

Tags: Lockdown, Uddhav thackeray

पुढील बातम्या