'...तर आढळराव राजकारण सोडणार का?' शिरुरमध्ये राजकीय वाद पेटला

'...तर आढळराव राजकारण सोडणार का?' शिरुरमध्ये राजकीय वाद पेटला

अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे.

  • Share this:

शिरूर, 12 एप्रिल : शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात आता अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेसाठी मी घर विकलं, हे खोटं असल्याचा आरोप शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला. मी मालिकेसाठी माझं नवं घर विकलं होतं. त्यामुळे आता माझं त्यांना आव्हान आहे की, माझ्यावरील आरोप खोटा आहे हे मी सिद्ध करतो. तुम्ही राजकारण सोडून दाखवा,' असं खुलं आव्हान अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. त्यामुळे आढळराव पाटील याला आता कसं उत्तर देतात, हे पाहावं लागेल.

शिरूरमध्ये होणार जोरदार लढत

पश्चिम महाराष्ट्रातील हा मतदारसंघ 2008 साली तयार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव-पाटीलांनी बाजी मारली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला लागूनच आहे. असं असलं तरीही मागील दहा वर्षांत ही जागा राष्ट्रवादीला जिंकता आलेली नाही. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी थेट लढत होत असते.

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

जुन्नर

आंबेगाव

खेड-आळंदी

शिरूर

भोसरी

हडपसर

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सामाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघांत प्रामुख्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेले पाहायला मिळते. पण असं असलं तरीही लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेचे आढळराव-पाटील बाजी मारतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत समझोता झाल्याचा आरोप करण्यात येतो.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 साली झालेल्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. आढळराव पाटील यांनी तब्बल 1 लाख 79 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत आढळरावांनी आपला गड राखत राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांना तब्बल 2 लाख 98 हजार मतांनी धूळ चारली होती. यावेळी देशभरात असलेल्या मोदी लाटेचा फायदा आढळराव यांनाही झाला होता. कारण या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढत होते.

मतदार संख्या आणि स्वरूप

या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 18 लाख 24 हजार 112 एवढी होती. यातील 10 लाख 89 हजार 573 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पुरूष मतदारांचं प्रमाण : 53.35 टक्के

स्त्री मतदारांचं प्रमाण : 46.65 टक्के

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

वाघोली- शिक्रापूर परिसरात वाहतूक कोंडी, अष्टविनायक तसेच भिमाशंकर रस्त्याचे रुंदीकरण झाले नसून पुणे- नाशिक महामार्ग रखडला आहे, असे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. तसंच खेड तालुक्यातील विमानतळ केवळ आढळराव पाटील यांच्यामुळे पुरंदरला गेले असा आरोप आढळराव यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवरून आढळराव-पाटील यांनी विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!

First published: April 12, 2019, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading