जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : ऋषभ पंतची कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, नव्या जबाबदारीबद्दल म्हणाला...

IND vs SA : ऋषभ पंतची कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, नव्या जबाबदारीबद्दल म्हणाला...

IND vs SA : ऋषभ पंतची कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, नव्या जबाबदारीबद्दल म्हणाला...

भारत- दक्षिण आफ्रिका मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर गेला. राहुलच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचा कॅप्टन आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिला टी20 सामना आज (गुरूवार) नवी दिल्लीमध्ये होणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर गेला. राहुलच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टनसी सांभाळणार आहे. टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्माला या मालिकाेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पंतनं या मॅचपूर्वी नव्या जबाबदारीबद्दल सांगितलं की, ‘कॅप्टन होणे ही खूप चांगली जाणीव आहे. अर्थात मला ही जबाबदारी चांगल्या परिस्थितीमध्ये मिळाली नाही. मला एक तासापूर्वीच याबाबत समजलं आहे.  विशेषत:  माझ्या शहरात मला ही जबाबदारी मिळणं ही खूप खास भावना आहे,’ असं त्यानं सांगितलं. पंत गेल्या दोन सिझनपासून आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा कॅप्टन आहे. बॅटींगमध्ये बदल होणार? पंतनं दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन म्हणून त्याच्या बॅटींगच्या क्रमवारी बऱ्याचदा बदल केले होते. ती पद्धत तो या मॅचमध्येही करणार का असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला. त्यावर पंत म्हणाला की, ‘माझा बॅटींगमधील नंबर परिस्थितीवर अवलंबून आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही सतत बॅटींगमधील क्रमांक बदलणार नाहीत. कारण, आम्ही स्पिनर्सना खूप चांगल्या पद्धतीनं खेळलतो. पण, बॅटींग ऑर्डर बदलण्याची गरज भासली तर आम्ही तसं करू. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन म्हणून मिळालेल्या अनुभवाचा मला फायदा होईल. त्यावेळी केलेल्या चुकांमधून मी बरंच काही शिकलो आहे,’ असं पंत म्हणाला. दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी केएल राहुल टीममध्ये नसल्यामुळे गुरूवारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) ओपनिंगला खेळतील. अजूनही टीमने केएल राहुलच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. बाबर आझमनं टाकलं विराटला मागं, ‘हा’ रेकॉर्ड करणारा पहिलाच क्रिकेटपटू भारतीय टीम : ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात