शाहीनबाग आंदोलक आणि अमित शाहांच्या भेटीमध्ये नवा ट्विस्ट, गृहमंत्रालयाने बैठकीचं वृत्त फेटाळलं

शाहीनबाग आंदोलक आणि अमित शाहांच्या भेटीमध्ये नवा ट्विस्ट, गृहमंत्रालयाने बैठकीचं वृत्त फेटाळलं

नवी दिल्लीतील शाहीनबागमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन काही संपण्याचं नाव घेत नाही आहे. शाहीनबागमधील आंदोलक उद्या दुपारी अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र

  • Share this:

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : नवी दिल्लीतील शाहीनबागमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन काही संपण्याचं नाव घेत नाही आहे. CAA आणि NRC विरोधात शाहीनबागमध्ये आंदोलक एकवटले आहेत.  ‘’गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण देशाला नागरिकत्त्व सुधारणा कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता त्यांची भेट घेणार आहोत. यासाठी आमचा ठराविक कोणता प्रतिनिधी नसून, ज्यांना CAA बाबत काही तक्रार आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही जाणार आहोत’’ अशी माहिती शाहीनबागमधील आंदोलकांनी दिली आहे. पायी मोर्चा काढत आंदोलक गृहमंत्री अमित शाह यांचं निवासस्थान गाठणार आहेत. नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात गेले 2 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अखेर 63 दिवसांनी गृहमंत्री आणि शाहीनबागचे आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

मात्र गृहमंत्रालयाकडून हे वृत्त नाकारण्यात आलं आहे. अमित शाह यांनी CAA बाबत चर्चा करण्यासाठी शाहिनबाग आंदोलकांसोबत अशा कोणत्याही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं नाही, अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

15 डिसेंबरपासून शाहीनबागमध्ये नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांमध्ये मुख्यत: महिलांचा समावेश आहे. CAA रद्द करण्यात यावं ही या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे NRCला देखील या आंदोलकांचा विरोध आहे. मात्र सरकारकडून वेळोवेळी दावा करण्यात आला आहे की हा कायदा नागरिकत्त्व हिरावून घेणारा नसून नागरिकत्त्वाचं रक्षण करणारा कायदा आहे.

First published: February 15, 2020, 6:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या