तिघेही पोलिसात! दुसऱ्याशी जुळले अन् पहिल्याला फसवले, सहन नाही झाले कॉन्स्टेबलने विष घेतले!

तिघेही पोलिसात! दुसऱ्याशी जुळले अन् पहिल्याला फसवले, सहन नाही झाले कॉन्स्टेबलने विष घेतले!

एखाद्या सिनेमात घडवा असा प्रकार जालना पोलीस दलात घडला आहे. मयत, प्रेयसी आणि प्रियकर हे तिघे ही पोलीस दलात कार्यरत असून तिघेही विवाहित आहेत.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 15 फेब्रुवारी : जगभरात एकीकडे प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर एकमेकांकडे आपला प्रेम व्यक्त करत असताना याच दिवशी खाकीतील वीरांच्या त्रिकोणी प्रेमातून 'लव्ह, सेक्स अँड धोका' सहन न झाल्याने एका पोलीस शिपायाने विष प्राशन करून जीवन यात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली  आहे.  याप्रकरणी जालना पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एखाद्या सिनेमात घडवा असा प्रकार जालना पोलीस दलात घडला आहे. घडलेली हकीकत अशी की, बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असलेल्या विष्णू रामराव गाढेकर (वय33) या पोलीस शिपायाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मयत, प्रेयसी आणि प्रियकर हे तिघे ही पोलीस दलात कार्यरत असून तिघेही विवाहित आहेत.

जाफराबाद तालुक्यातील सवासनी येथील विष्णू रामराव गाढेकर हा 2010 मध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलात भरती झाला होता.  सध्या तेथील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होता. त्याचे हसनाबाद पोलीस ठाण्यात कार्यरत एका महिला पोलीस शिपायासोबत प्रेम संबंध जुळले होते. दरम्यान,मध्यंतरी त्या महिला पोलीस शिपायाचे त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायावरही प्रेम जडले. यानंतर सदर महिला पोलीस शिपायाने त्याच्यासोबत संगनमत करून अनैतिक संबंधाचे कारण पुढे करत लग्नाची आणि पैश्याची मागणी करीत विष्णू गाढेकर याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

तसंच मागणी मान्य न केल्यास, 'तुला आणि तुझ्या मुलीला जीवे मारू', अशा धमक्या देत होते. वारंवार होणारी पैशांची मागणी आणि जीवे मारण्याची धमकीमुळे त्रस्त झालेल्या विष्णू गाढेकर याने ड्युटीवरून गावाकडे परत जाताना देऊळगावराजा येथून विषारी औषध विकत घेतले आणि रस्त्यातच प्राशन केले. त्यांनतर त्याने आपल्या पत्नीला कॉल करून, 'मी पोलीस शिपाई आणि एका महिला पोलीस शिपायाच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. एवढं बोलून त्याने मोबाईल बंद केला. त्यांनतर रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या विष्णू गाढेकरला नातेवाईकांनी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला होता. दरम्यान, उपचार सुरू असतानाच विष्णू गाढेकर याची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी मयत विष्णू गाढेकरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई आणि संबंधीत महिला पोलीस शिपायावर जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ऐन व्हॅलेंटाईन डे च्यादिवशीच विवाहित खाकीतील वीरांच्या या त्रिकोणी प्रेमातून एका पोलीस शिपायाला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

First published: February 15, 2020, 8:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading