औरंगाबाद, 18 जानेवारी : सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीतून भास्कर पेरे पाटील यांनी माघार घेतली होती, तर त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मात्र पेरे पाटील यांच्या मुलीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
पाटोद्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श सरपंच अशी ओळख असलेल्या भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, मी ही निवडणूक लढवत नसल्याने निवडणूक काळात मी गावात जाणार नाही, तसंच मुलीचा प्रचारही करणार नाही, अशी भूमिका पेरे पाटील यांनी बोलून दाखवली होती.
ग्रामपंचायत निकालाच्या दिवशी सुप्रिया सुळे-रोहित पवार कुठे आणि काय करत आहेत?
विधानसभेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्याला धक्का
पाटोद्याची ग्रामपंचायत का आहे राज्यात चर्चेत?
- राज्यातील अनेक ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करणारी आणि गावातील विकास झपाट्याने करणारी ग्रामपंचायत अशी पटोद्याची ओळख
- ग्रामपंचायतीला कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले
- विकास पुरुष म्हणून गौरव झाला ते बहुचर्चित सरपंच भास्कर पेरे पाटील हे स्वत: निवडणूक लढवत नसल्यामुळे तब्बल पंचवीस वर्षांनी सत्तांतर होताना दिसत आहे.
- पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भास्कर पेरे यांची मुलगी अनुराधा भास्कर पेरे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता
- मात्र निवडणुकीत अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Gram panchayat