बारामती, 18 जानेवारी : राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालांची (Grampanchayat Results) धामधूम सुरू आहे. निकालांच्या या धामधुमीमध्ये पवार कुटुंब मात्र बारामतीमध्ये आहे. आजपासून बारामतीमध्ये कृषिक 2021 या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार तसंच कृषीमंत्रा दादा भुसे हे बारामतीमध्ये आहेत.
सुप्रिया सुळे यांनी या प्रदर्शनातला एक व्हिडिओ फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून टाकला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित पवार हे गाडीच्या मागे बसले आहेत, तर सुप्रिया सुळे स्वत: फेसबूक लाईव्ह करत आहेत. शरद पवार, अजित पवार आणि दादा भुसे गाडीत पुढे बसले आहेत. तसंच गाडीतले अधिकारी या सगळ्यांना तिथली माहिती देत आहेत.
या कृषिक 2021 ला राज्याच्या आणखी काही मंत्रीही हजेरी लावणार आहेत. मागच्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रदर्शनाला हजेरी लावली होती.
माळेगाव, बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव खुर्ध आणि बायर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने यावेळचा कृषिक 2021- कृषी तंत्रज्ञान सप्ताह सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहता यावं, तसंच त्यांना आपल्या शिवारात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित व्हावं, यासाठी या सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याचं ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.