मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MBA नंतर बडी कंपनी सोडून परतला गावात; उच्चशिक्षित तरुणानं असं घडवलं सत्तांतर

MBA नंतर बडी कंपनी सोडून परतला गावात; उच्चशिक्षित तरुणानं असं घडवलं सत्तांतर

अनिल जोशी हे MBA झालेले. मोठ्या शहरात एक बड्या कंपनी मॅनेजर म्हणून नोकरी करणारा तरुण गावच्या राजकारणात उतरला तो विकासाचा ध्यास घेऊन.

कर्जत, 18 जानेवारी: गावातलं राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारणाचा खेळ. विकासाऐवजी सत्तेच्या राजकारणात रस असलेली मंडळी, अशी गावाकडच्या निवडणुकीची प्रतिमा शहरांत असते. पण गावातल्या तरुणांनी ठरवलं तर या राजकारणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न नक्की करू शकतात. 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने अशी काही ठळक उदाहरणं दिसली, ज्यांनी विकासासाठी सत्तापालट केलं. शहरातली आकर्षणं सोडून जे विकासासाठी गावाकडे परतले आणि ज्यांनी सत्तांतर घडवलं. त्यातलंच एक नाव आहे कर्जत तालुक्यातस्या पोशीर ग्रूप ग्रामपंचायतीच्या अनिल जोशी यांंचं.

अनिल जोशी हे MBA झालेले. मोठ्या शहरात एक बड्या कंपनी मॅनेजर म्हणून नोकरी करणारा तरुण गावच्या राजकारणात उतरला तो विकासाचा ध्यास घेऊन. त्यांनी प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मैदानात उडी मारली आणि बाजीही मारली. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या पोशीर ग्रूप ग्रामपंचातीची निवडणूक लक्षवेधी ठरली ती अनिल जोशी यांच्यामुळे.

जळगाव जिल्ह्यात 'या' ग्रामपंचायतीत तृतीयपंथी उमेदवारानं खेचून आणली विजयश्री

निवडणुकीत शिवसेना-शेकाप प्रणित परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. या भागात शेकापचं प्रथमपासून वर्चस्व आहे. पण विकासाचं धोरण राबवू असं सांगणाऱ्या अनिल जोशींना ग्रामस्थांनी नवा सरपंच म्हणून आधीच मान्यता दिली. ते मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकले आहेत.

या 21 वर्षांच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे राजकारणी एकवटले पण....

जोशी यांना या आधीच सरपंच पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे पोशिर ग्रुप ग्रामपंचायतीत पुढचे सरपंच अनिल जोशी असणार आहेत हे निश्चित. गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी स्पष्ट केले आहे.

First published:

Tags: Breaking News, Gram panchayat, MBA, Raigad news