जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

Delta Plus variant Death: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून: राज्यात कोरोनाची (COVID-19) दुसरी लाट आटोक्यात येत असताना दुसरं संकट उभं ठाकलं आहे. आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (Delta Plus Variant) व्हेरिएंटनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं एक बळीही घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. तसंच 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्यानुसार आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा-  ‘‘जेलमध्ये जाणारच…अनिल देशमुख छगन भुजबळ यांच्या मार्गावर’’, भाजप नेत्याचं धक्कादायक विधान तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीर आरोग्य विभागानं तयारी सुरु केली आहे. या लाटेला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असंही ते म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश (Maharashtra, Kerala and Madhya Pradesh) या राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 21, मध्य प्रदेश 6, केरळ 3, रुग्ण आढळून आलेत. केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं योग्य आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात