मुंबई, 29 एप्रिल: राज्यात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि कोरोना विषाणूची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) लॉकडाऊन वाढवण्याचा (Lockdown increase) निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात आता 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले सर्व नियम या कालावधीत लागू असणार आहेत. या कठोर निर्बंधांच्या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे निर्बंध राज्यात 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
Maharashtra government extends current COVID19 restrictions till May 15 pic.twitter.com/TaE6hCJoIV
— ANI (@ANI) April 29, 2021
वाचा: Covishield पाठोपाठ Covaxin सुद्धा झाली स्वस्त; Bharat Biotech ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत
राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध लागू केले होते आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. त्यानुसार काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झाला आणि आज अखेर लॉकडाऊनचा कालावधी 15 दिवसांनी वाढवण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यात मोफत लसीकरण
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असून हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र लसींच्या उपलब्धतेबाबत आव्हानात्मक परिस्थिती असल्याने इच्छा असुनही1 मे पासून लसीकरणास प्रारंभ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ मंत्र्यांची समिती 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown