मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Covishield पाठोपाठ Covaxin सुद्धा झाली स्वस्त; Bharat Biotech ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत

Covishield पाठोपाठ Covaxin सुद्धा झाली स्वस्त; Bharat Biotech ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत

Covishield आणि Covaxin भारतातील दोन्ही कोरोना लशींच्या (Corona vaccine) किंमती कमी झाल्या आहेत.

Covishield आणि Covaxin भारतातील दोन्ही कोरोना लशींच्या (Corona vaccine) किंमती कमी झाल्या आहेत.

Covishield आणि Covaxin भारतातील दोन्ही कोरोना लशींच्या (Corona vaccine) किंमती कमी झाल्या आहेत.

हैदराबाद, 29 एप्रिल: कोविशिल्ड (covishield) पाठोपाठ आता कोवॅक्सिन (Covaxin) लशीची किंमतही (Covaxin price) कमी करण्यात आली आहे. दोन्ही कोरोना लशी आणखी स्वस्त (Corona vaccine price) झाल्या आहेत. भारत बायोटेकेने (Bharat biotech) आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. कोवॅक्सिनचे दरही आता कमी करण्यात आले आहेत.

कोवॅक्सिन लशीचा प्रति डोस राज्य सरकारसाठी 600 रुपये होता. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये ठेवण्यात आला होता. पण आता राज्य सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे. आता फक्त 400 रुपये प्रति डोस ही लस उपलब्ध होईल. म्हणजे जवळपास 200 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे.

याआधी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत कमी केली होती. कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य सरकारसाठी सीरमने आपले दर कमी केले आहेत. राज्य सरकारला ही लस आता 400 ऐवजी 300 रुपयांना दिली जाणार आहे. म्हणजे 100 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे.

हे वाचा - संसर्ग होतोच मग मी कोरोना लस का घ्यावी? संशोधकांनी सांगितला मोठा फायदा

1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण होणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही राज्य सरकारची असणार आहे. राज्य सरकार आणि खासगी रुग्णांलयांना थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदी करण्याची मुभा केंद्र सरकारने दिलेली आहे. आतापर्यंत या कंपन्या फक्त केंद्राला लस पुरवठा करत होत्या. राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी लशीची एक किंमत ठरवण्यास सरकारने सांगितलं होतं. त्यानुसार भारतात आपात्कालीन वापरात असलेल्या  दोन्ही लशीच्या उत्पादक कंपन्यांनी आपल्या लशीची किंमत जारी केली.

हे वाचा - तज्ज्ञांनी केलं Alert! तातडीने लस घ्या; अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार

पण यापेक्षा आणखी किंमत कमी करावी, अशी विनंती केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांकडे केली होती. त्यानुसार सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने आपल्या लशीची किंमत कमी केली आहे. राज्य सरकारसाठी नवे दर जाहीर केले आहेत. पण खासगी रुग्णालयांसाठी मात्र आपल्या लशीचे दर बदललेले नाहीत. त्याबाबत काही सांगितलेलं नाही.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Lifestyle