मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /यंदाची शिवजयंती पोवाडे, रॅली, प्रभातफेरीशिवाय होणार! साधेपणाने साजरी करण्याविषयी सरकारने दिल्या सूचना

यंदाची शिवजयंती पोवाडे, रॅली, प्रभातफेरीशिवाय होणार! साधेपणाने साजरी करण्याविषयी सरकारने दिल्या सूचना

Covid-19 अजून संपलेला नाही. त्यामुळे शिवजयंती साजरी (Shiv jayanti 2021) गाइडलाइन्सच ठाकरे सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

Covid-19 अजून संपलेला नाही. त्यामुळे शिवजयंती साजरी (Shiv jayanti 2021) गाइडलाइन्सच ठाकरे सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

Covid-19 अजून संपलेला नाही. त्यामुळे शिवजयंती साजरी (Shiv jayanti 2021) गाइडलाइन्सच ठाकरे सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई, 11 फेब्रुवारी :  Coronavirus च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा (Shiv jayanti 2021) साधेपणाने साजरी करावी, अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. शिवजयंती साजरी करण्यासंबंधीच्या गाइडलाइन्सच (guidelines for shiv jayanti) ठाकरे सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार बाईक रॅली, प्रभात फेरी, पोवाडे वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला बंदी घालण्यात आली आहे.

19 फेब्रुवारीला तारखेनुसार महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्त दरवर्षी गडकिल्ल्यांवर महाराजांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम होतो. या वर्षी असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार नाहीत. Covid-19 चा धोका टळलेला नाही, याची आठवण करून देत राज्य सरकारतर्फे नेमकी शिवजयंती कशी साजरी करायची याचे नियम जारी करण्यात आले आहेत.

दरवर्षीप्रमाणे रॅली, प्रभात फेरी वगैरे आयोजित न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आयोजित करावा, अशी यात सूचना आहे. जास्तीत जास्त 10 लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करायला परवानगी आहे. मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच शिवजयंती साजरी करा, असं आवाहन ठाकरे सरकारने केलं आहे.

'एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?' राम कदम यांचा शिवसेनेवर घणाघात

भाजपची टीका

शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर घणाघाती टीका केली आहे. ज्यांच्या नावाने पक्ष चालवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. शिवसेना सरकारने एक तुगलकी फर्मान काढलं आहे, अशा शब्दांत भाजपने ठाकरे सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांवर टीका केली आहे.

कोरोनाचं केंद्र बदललं

दरम्यान कोरोनाचं केंद्र आता शहरांकडून निमशहरी भागांकडे वळलं आहे. मुंबई (mumbai coronavirus), पुण्यात (pune coronavirus) थैमान घालणाऱ्या कोरोनानं (coronavirus) आता आपलं केंद्र बदललं आहे. आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट (corona hotspot) समोर आले आहे. तर मुंबई, पुणे, ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनानं आता इतर जिल्ह्यांकडे कूच केली आहे. राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळे आता अधिक सावध राहण्याची गरज आहे.

First published:

Tags: Shivaji maharaj, Shivjayanti