जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Rain : महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारची मदत, अजित पवारांची विधिमंडळातून घोषणा

Maharashtra Rain : महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारची मदत, अजित पवारांची विधिमंडळातून घोषणा

पूरग्रस्तांसाठी अजित पवारांकडून मदतीची घोषणा

पूरग्रस्तांसाठी अजित पवारांकडून मदतीची घोषणा

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये मदतीची घोषणा केली आहे. सरकार सगळ्यांना मदत करणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. पुरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत केली जाणार आहे, तसंच दुकानांचं नुकसान झालं असेल तर 50 हजार रुपये आणि टपरीचं नुकसान झालं असेल तर 10 हजार रुपये देणार असल्याचं अजित पवार म्हणाल आहेत. पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देण्यात येणार आहे, तसंच दुबार पेरणीकरता बियाणंही उपलब्ध होतील, शेतकरी अडचणीत येणार नाही. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करणार आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. तसंच आपण एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत केली आहे. पुरामुळे गावातले रस्ते खराब झाले असतील तर बांधकाम विभाग रस्ते दुरूस्त करतील, असंही अजित पवार म्हणाले. …अन् जयंत पाटलांनी सुनील तटकरेंना मारली मिठी, PHOTOS मुळे चर्चांना उधाण ‘19 ते 23 जुलै दरम्यान यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम येथे पीक मालमत्ता नुकसान झाले. 23 जुलैला पाहणी केली. पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत करणार, धानाचा पुरवठा करणार. घरात पाणी शिरलं आहे, त्यांना पहिले पाच हजारांची मदत मिळत होती. आता ही मदत 10 हजार रुपये दिली जाईल. केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना 7 दिवसांच्या आत मदत दिली जाईल. दुकानाचं नुकसान झाल्यास आधी मदत दिली जात नव्हती, आता 50 हजार रुपये दिली जातील,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली. ‘चंद्रपुरात मोठं नुकसान झालं आहे, मुख्यमंत्री आणि मंत्री घटनास्थळी गेल्यानंतर कामाला वेग आलेला पाहायला मिळाला. सर्व जिल्हाधकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली जाईल, त्यानंतर आवश्यकतेनुसार आदेश दिले जातील, सरकार कुणालाही निधीची कमतरता भासू देणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एनडीआरएफच्या मदतीपेक्षा जास्त मदत दिली आहे. सरकार सर्वांना मदत करेल,’ असं अजित पवार विधान परिषदेमध्ये म्हणाले आहेत. देशाची काळजी घ्या, चांगलं वागा, वाचलो तर भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात