अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे, जयंत पाटील हे शरद पवार गटात तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत.
विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.
जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी एकमेकांना मिठी मारल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती.
जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गटात आहेत, तेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.