सांगली, 29 जुलै: पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) झालेल्या अतिवृष्टीचा सांगली (Sangli), सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांना मोठा फटका बसला. पूरग्रस्त सांगली आणि साताऱ्याचा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दौरा केला. 2019 च्या तुलनेत यंदाचा नुकसान अधिक असल्याने अधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भिलवडी या ठिकाणी पूर पाहणी प्रसंगी पूरग्रस्तांची संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) हा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. तालुक्यातून फडणवीस यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. भिलवडी याठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत येथील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 च्या प्रमाणेच हा महापूर आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झालेल आहे.
भाजपसोबत युती करणार? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टच उत्तर, म्हणाले....
सर्व सामान्य माणसा पासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषा पलिकडे सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकरयांना मदत केली होते. या वेळीही अधिक नुकसान आहे, त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवे आणि त्या दृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर आपला दबाव असेल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आमचा संघर्ष करू, असा इशाराही देवेंद्र फडणीस यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
पंचनाम्यानंतर पॅकेजची घोषणा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी तातडीने 10 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने मदत देण्याबाबत चर्चा झाली त्यानुसार आता पूरग्रस्तांना तातडीने मदत म्हणून प्रत्येकाच्या खात्यात 10 हजार रुपये दिली जाणार आहे. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यावर मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात .येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Rain flood