मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्र आजपासून अनलॉक, पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

महाराष्ट्र आजपासून अनलॉक, पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

Maharashtra five level unlock:आजपासून महाराष्ट्र  (Maharashtra Unlock) अनलॉक होतं आहे.  कसं असेल आजपासून राज्यातील अनलॉक वाचा सविस्तर.

Maharashtra five level unlock:आजपासून महाराष्ट्र (Maharashtra Unlock) अनलॉक होतं आहे. कसं असेल आजपासून राज्यातील अनलॉक वाचा सविस्तर.

Maharashtra five level unlock:आजपासून महाराष्ट्र (Maharashtra Unlock) अनलॉक होतं आहे. कसं असेल आजपासून राज्यातील अनलॉक वाचा सविस्तर.

मुंबई, 07 जून: आजपासून महाराष्ट्र (Maharashtra Unlock) अनलॉक होतं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकबाबत आदेश जारी केली. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून होत आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात आलेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित केलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल. (Maharashtra five level unlock begins today check out news rules)

कसं असेल आजपासून राज्यातील अनलॉक

पहिला स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले आहेत. या टप्प्यात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.

दुसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे

तिसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले आहेत. याठिकाणी व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.

चौथा स्तर- पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.

पाचवा स्तर- पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे

काय काय होणार अनलॉक

पहिला स्तर

मॉल, दुकाने, थिएटर आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होतील. रेस्टॉरंटसाठीही परवानगी असेल. लोकल सेवेबाबतचा निर्णय त्याठिकाणचं स्थानिक प्रशासन घेईल. सार्वजनिक मैदानं, वॉकिंग, सायकलिंग याला परवानगी असेल. 100 टक्के क्षमतेनं सरकारी कार्यालये खुली करण्यासही परवानगी असेल. खेळ, शूटींग, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, बैठका, निवडणूक यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहाणार नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या भागात जमावबंदीही नसेल.

दुसरा स्तर

दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येथील तिथे सर्व प्रकारची दुकानं पूर्णवेळ सुरु होतील. (All types of shops will be open full time in all the districts) ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये 50 टक्केच उपस्थितीची अट राहील. रेस्टॉरंटसाठीही 50 टक्के क्षमतेस परवानगी. या स्तरात लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असेल.सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू असतील. या स्तरात विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ राहील. शूटिंगलाही परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50 टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा 100 टक्के क्षमतेने सुरू होईल. या भागात जमावबंदी लागू असेल.

तिसरा स्तर

तिसऱ्या स्तराच्या जिल्ह्यात दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील तर शनिवार, रविवारी ती बंद असतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.

चौथा स्तर

चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील.

पाचवा स्तर

अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू असतील. शनिवार, रविवारी ती बंद राहतील.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra, Mumbai, Pune