• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज्यातील चार महापालिकांमध्ये पोटनिवडणुकीचा धुराळा, 21 डिसेंबरला मतदान, वाचा संपूर्ण कार्यक्रम

राज्यातील चार महापालिकांमध्ये पोटनिवडणुकीचा धुराळा, 21 डिसेंबरला मतदान, वाचा संपूर्ण कार्यक्रम

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर :  धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी (Municipal by-election) 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक (Maharashtra Election Cmmission) आयुक्त यू. पी. एस. मदान (U P S Madan) यांनी केली आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशीदेखील माहिती मदान यांनी दिली. या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर होईपर्यंत अंमलात राहील, असं आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.

  निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?

  "पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होईल", अशी माहिती आयुक्त मदान यांनी दिली. पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे अशी: धुळे- 5 ब अहमदनगर- 9 क नांदेड वाघाळा- 13 अ सांगली मिरज कुपवाड- 16 अ.रा हेही वाचा : 'एसटीचं विलिनीकरण केल्यास इतर महामंडळांचंही विलिनीकरणही करावं लागेल' महाराष्ट्रातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचं मतदानही 21 डिसेंबरलाच राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग काहीसा मंदावला आहे. पण कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक मोठ-मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. अनेक महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधी महापालिकेकडून आधी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या 7 हजार 130 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली होती. या सर्व जागांसाठी 21 डिसेंबरलाच मतदान होणार आहे. तर त्याची मतमोजनीही 22 डिसेंबरला होणार आहे.
  Published by:Chetan Patil
  First published: