मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण, निती आयोगाच्या इशाऱ्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंची दिलासादायक माहिती

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण, निती आयोगाच्या इशाऱ्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंची दिलासादायक माहिती

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

Corona Third Wave: देशात तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. निती आयोगाने (Niti Ayog)हा इशारा दिला आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट: देशातील दुसरी लाट (Second Wave) आता नियंत्रणात आली आहे. मात्र आता देशात तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. निती आयोगाने (Niti Ayog)हा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण असल्याचं राजेश टोपे म्हणालेत.

नीती आयोगाचा अलर्ट आजचा नसून केंद्राला आलेलं पत्र जून महिन्यातलं असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्याला सद्यस्थितीत कोणताही अलर्ट किंवा इशारा दिलेला नसल्याचं ते म्हणालेत आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारी देखील पूर्ण झाली असल्याचं माहिती त्यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्याचा अंदाज आणि निरीक्षण सुरू असून त्यानंतरच मंदिर शाळा उघडण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्यातील गोविंदा पथकांना मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन, म्हणाले...

नीती आयोगाचा इशारा

तिसऱ्या लाटेचा (third wave) इशारा निती आयोगाने (Niti Ayog) दिला आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरून आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. बाजारपेठा खुल्या होत असून देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता निती आयोगानं तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यामुळे चिंता वाढली आहे.

निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सरकारला याबाबत महत्त्वाची आकडेवारी सादर केली असून देशातील नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या आहेत. तिसऱ्या लाटेबाबतच्या या अहवालात अनेक शिफारसीदेखील करण्यात आल्या असून देशाला भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं लागेल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. तिसरी लाट जेव्हा टोक गाठेल, तेव्हा देशात दैनंदिन 4 ते 5 लाख नवे कोरोनाबाधित सापडू शकतील, असा अंदाज निती आयोगानं व्यक्त केला आहे.

निष्पाप भाजीविक्रेत्याला झालेल्या बेदम मारहाणीचा LIVE Video

देशात जवळपास 2 लाख आयसीयु बेड तयार ठेवावे लागतील, असा अंदाजही निती आयोगानं सरकारला दिला आहे. याशिवाय 5 लाख ऑक्सिजन बेड आणि 10 लाख आयसोलेशन केअर बेडची गरज वर्तवण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Rajesh tope